20 February 2019

News Flash

साजिद चुकलास! मी तुझ्या नाही, छळ झालेल्या मुलींच्या बाजूने -फराह खान

लैंगिक गैरवर्तणुकीच्या आरोपानंतर पहिल्यांदाच त्याची बहिण फराह खान हिनं प्रतिक्रिया दिली आहे.

फराह खाननं आता साजिदच्या कृष्णकृत्याची ट्विटरवर निंदा केली आहे.

दिग्दर्शक साजिद खान यांच्यावर सुरू असलेल्या लैंगिक गैरवर्तणुकीच्या आरोपानंतर पहिल्यांदाच त्याची बहिण फराह खान हिनं प्रतिक्रिया दिली आहे. मी साजिदच्या वागण्याचं कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही, मी त्या प्रत्येक महिलेच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे असं फराह खाननं म्हटलं आहे. फराह स्वत: एक दिग्दर्शिका आणि कोरिओग्राफर आहे. नेहमीच आपल्या भावाच्या पाठीशी उभ्या राहणाऱ्या फराह खाननं आता साजिदच्या कृष्णकृत्याची ट्विटरवर निंदा केली आहे.

#MeToo: ‘साजिद खान नको तिथे स्पर्श करायला लावायचा’

महिला पत्रकार करिश्मा उपाध्याय, अभिनेत्री सलोनी चोप्रा या दोघींनी साजिद खानवर गंभीर आरोप केले आहेत. आपल्या ट्विटर पोस्टद्वारे त्यानं साजिद खानची विकृती आणि महिलांप्रती असलेलं त्याचं असभ्य वर्तन जगासमोर आणलं होतं. त्यानंतर फराह खाननं ट्विट करत साजिदच्या वर्तनावर जाहीर टीका केली आहे. जे काही आरोप सुरू आहेत त्यामुळे मला आणि माझ्या कुटुंबियांना खूपच दु:ख झालं आहे. माझं कुटुंब मानसिक धक्क्यातून जात आहे. जर माझ्या भावानं अशा प्रकारे असभ्य वर्तन केलं असेल तर त्याला याची शिक्षा भोगावीच लागेल. माझ्या भावाच्या कोणत्याही कृतीचं मी समर्थन करत नाही. मी त्या प्रत्येक महिलेच्या पाठीशी उभी आहे’ असं फराहनं ट्विट करत म्हटलं आहे.

#MeToo : महिला पत्रकारासोबतही साजिदनं केलं लैंगिक गैरवर्तन

साजिदवर झालेल्या आरोपानंतर अक्षय कुमारनंही त्याच्यासोबत काम न करण्याचं ठरवलं आहे. त्यानं साजिदचा ‘हाऊसफुल ४’ चित्रपटाचं चित्रीकरण बंद ठेवण्याची विनंती निर्मात्यांना केली आहे. तर अक्षयची पत्नी ट्विंकल खन्ना हिनं देखील ‘हाऊसफुल ४’ च्या कलाकारांनी यावर ठोस भूमिक घेण्याचं आवाहन ट्विटद्वारे केलं आहे.

साजिदनं ट्विट करत हे सारे आरोप खोटे आहेत, सत्य लवकरच बाहेर येईल पण तोपर्यंत मी नैतिक जबाबदारी स्वीकारत दिग्दर्शक पदावरून पायउतार होत आहे असं म्हटलं आहे.

First Published on October 12, 2018 5:41 pm

Web Title: farah khan react on sexual assault allegations against sajid khan