18 November 2017

News Flash

रवीना टंडनला झालंय तरी काय?

फराहचा हा शो अमेरिकेतील प्रसिद्ध शो 'लिप सिंक बॅटल'वर आधारित आहे

लोकसत्ता ऑनलाइन | Updated: September 13, 2017 5:33 PM

रवीना टंडन आणि फराह खान

लवकरच स्टार प्लसवर फराह खानचा ‘लिप सिंग बॅटल’ हा नवा शो सुरू होणार आहे. या शोमध्ये अनेक बॉलिवूड तसेच टीव्ही कलाकार सहभागी होणार आहेत. शोचे सूत्रसंचालन फराह खान आणि अली असगर करणार आहेत. बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडनने नुकतेच या शोचे चित्रीकरण पूर्ण केले. फराहने रवीनासोबतचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला. या फोटोमध्ये रवीनाचा अवतार पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटेल.

सोशल मीडियावर ट्रोल झाल्यानंतर शिल्पाने तो व्हिडिओ केला डिलीट

रवीनाने बॉलिवूडचा ‘झक्कास बॉय’ अनिल कपूर यांची वेशभूषा केली होती. या लूकमध्ये ती हुबेहुब अनिल कपूरसारखीच दिसते. तिने ‘राम-लखन’ सिनेमातील अनिल कपूरचा लूक कॉपी केला आहे. कार्यक्रमात रवीना, अनिलच्या प्रसिद्ध गाण्यावर नाचलीही. रवीनाचा हा अनोखा अंदाज पाहून अनेकांनाच हा शो पाहण्याची उत्सुकता लागली असले यात काही शंका नाही.

GUESS WHO?? #lipsingbattle is just going bonkers!!

A post shared by Farah Khan Kunder (@farahkhankunder) on

फराहचा हा शो अमेरिकेतील प्रसिद्ध शो ‘लिप सिंक बॅटल’वर आधारित आहे. या कार्यक्रमात दोन सेलिब्रिटी स्पर्धकांना बॉलिवूडमधील प्रसिद्ध गाण्यांवर लिप सिंकिंग करायचे. जो स्पर्धक अधिक चांगल्या प्रकारे लिप सिंकिंग करु शकले तो स्पर्धक जिंकणार, असे या कार्यक्रमाचे स्वरुप आहे. या कार्यक्रमात अली असगर पुन्हा एकदा महिला व्यक्तिरेखेच्या भूमिकेत दिसणार आहे. या व्यक्तिरेखेचे नाव ‘कराह खान’ असे असणार आहे.

Lip pout battle!! @officialraveenatandon looking sexyy n me trying to look thin🙄#lipsingbattle

A post shared by Farah Khan Kunder (@farahkhankunder) on

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ‘इश्कबाज’ मालिकेतील कलाकार नकुल मेहता आणि सुरभी चंदा हेदेखील या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. या दोघांशिवाय मनीष पॉल, मलायका अरोरा, शबाना आझमी, परिणीती चोप्रा, करण जोहर आणि गायक मिका सिंगही सहभागी होतील.

First Published on September 13, 2017 5:33 pm

Web Title: farah khan show lip sing battle raveena tandon in anil kapoor getup ali asgar