News Flash

कोरिओग्राफर फराह खानला झाला करोना

सोशल मीडिया पोस्टद्वारे दिली माहिती...

कोरिओग्राफर फराह खानला झाला करोना

बॉलिवूडमधील अतिशय लोकप्रिय कोरिओग्राफर आणि दिग्दर्शिका फराह खानची करोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. फराह लवकरच छोट्या पडद्यावर प्रदर्शित होणाऱ्या एका कॉमेडी शोमध्ये परीक्षक म्हणून काम करताना दिसणार होती. पण आता करोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यामुळे तिने चित्रीकरण थांबवले आहे.

फराहने इन्स्टाग्राम अकाऊंटवर स्टोरी पोस्ट करत करोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याचे सांगितले आहे. त्यामुळे ती चित्रीकरण करत असलेल्या सेटवर योग्य ती काळजी घेतली जात आहे. करोना लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतरही फराहची करोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. तिच्या संपर्कात आलेल्या सर्वांना तिने करोना चाचणी करुन घेण्यास आणि काळजी घेण्यास सांगितले आहे.

कॉमेडी शोच्या आगामी भागांमध्ये फराह खान ऐवजी बॉलिवूड गायक मिका सिंग परीक्षक म्हणून दिसणार आहे. करोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यामुळे फराहला पुढचे काही दिवस चित्रीकरण करता येणार नाही. काही दिवसांपूर्वी फराहने शिल्पा शेट्टीचा डान्स रिअॅलिटी शो ‘सुपर डान्सर ४’चे चित्रीकरण केले होते.

देशात गेल्या २४ तासांत ४१ हजार ९६५ जणांना करोनाचा संसर्ग झाला आहे. त्यामुळे, देशात सद्यस्थितीत करोनावर उपचार घेणाऱ्यांचा एकूण आकडा ३ लाख ७८ हजार १८१ वर पोहोचला आहे. तर दुसरीकडे याच २४ तासांत देशात ३३ हजार ९६४ जण करोनामुक्त होऊन रुग्णालयातून घरी गेले आहेत. त्यामुळे देशातील एकूण करोनामुक्त झालेल्यांची संख्या आता ३ कोटी १९ लाख ९३ हजार ६४४ वर पोहोचली आहे. दरम्यान, या एका दिवसातील नव्या करोना रुग्णांचा आकडा हा करोनामुक्त झालेल्यांपेक्षा अधिक आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 1, 2021 4:57 pm

Web Title: farah khan tested covid positive avb 95
Next Stories
1 मुलीने चित्रपटात इंटिमेट सीन्स देण्यावर श्वेता तिवारीची कशी होती प्रतिक्रिया, पलक तिवारीने केला खुलासा
2 ‘कारभारी लयभारी’ फेम प्रणित हाटे ‘बिग बॉस मराठी ३’ मध्ये सहभागी होणार?
3 स्टार प्रवाहच्या कलाकारांचा जल्लोष, पारंपरिक पद्धतीने होणार गणरायाचं स्वागत
Just Now!
X