19 January 2020

News Flash

‘सत्ते पे सत्ता’च्या रिमेकमध्ये शाहरुख खान ?

आता माझ्याकडे या चित्रपटाचे हक्क आहेत

सध्या बॉलिवूडमध्ये अनेक चित्रपटांचे रिमेक येत आहेत. आता १९८२ मधील ‘सत्ते पे सत्ता’ या चित्रपटाचा रिमेक करण्यात येणार आहे. बॉलिवूडमधील प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शिका आणि दिग्दर्शिका फराह खान या चित्रपटाची निर्मीती करणार आहे. चाहत्यांसाठी हा सुखद धक्काच असणार आहे. चित्रपटात कोणते कलाकार झळकणार याची देखील सर्वत्र चर्चा सुरु आहे. या कलाकारांमध्ये अभिनेता शाहरुख खान आणि कतरिना कैफ दिसणार असल्याची चर्चा सर्वत्र सुरू आहे.

‘हिंदुस्तान टाईम्स’सह झालेल्या एका मुलाखतीमध्ये फराहने ‘सत्ते पे सत्ता’ या चित्रपटाच्या रिमेकचा खुलासा केला होता. त्या दरम्यान ‘मला पाच वर्षांपूर्वी कपिल शर्मा शोमध्ये कोणत्या चित्रपटाचा रिमेक करायला आवडेल असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावेळी मी सत्ते पे सत्ता या चित्रपटाचे नाव घेतले होते. आता माझ्याकडे या चित्रपटाचे हक्क आहेत’ असे फराह म्हणाली.

दरम्यान फराहला या चित्रपटात शाहरुख मुख्य भूमिकेत दिसणार का असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर फराहने ‘मी सध्या याचे उत्तर देऊ शकत नाही. पण मी नेहमी सांगत असते मला माझ्या प्रत्येक चित्रपटामध्ये शाहरुखसोबत काम करायला आवडेल. परंतु आम्ही अजून चित्रपटाची कथा लिहिणाच्या प्रक्रियेत आहोत’ असे उत्तर दिले आहे.

First Published on May 22, 2019 3:30 pm

Web Title: farah khans satte pe satta remake to feature shah rukh khan as lead
Next Stories
1 जाणून घ्या, ‘बिग बॉस’च्या १३व्या पर्वाचे कोण करणार सूत्रसंचालन ?
2 सलमान म्हणतो, या दिवशी करेन लग्नाची घोषणा
3 ‘…अन् माझं ते स्वप्न साकार झालं’, सुबोध भावेचं भावनिक ट्विट
Just Now!
X