20 January 2018

News Flash

दुसऱ्यांदा बाबा झाला फरदीन खान, बाळाचे नाव…

फरदीन आणि नताशाला तीन वर्षांची मुलगी आहे

लोकसत्ता ऑनलाइन | Updated: August 12, 2017 3:29 PM

फरदीन खान नताशा खान

बॉलिवूड अभिनेता फरदीन खान गेल्या काही काळापासून सिनेसृष्टीपासून दूरच आहे. फरदीनच्या पदार्पणातल्या काळात त्याच्या नावाची बरीच चर्चा झाली होती. पण त्याच्या वाटेला फारसे सिनेमे न आल्यामुळे तो हळूहळू प्रेक्षकांच्या विस्मरणातच गेला. पण आता पुन्हा तो चर्चेत आला आहे, याचं कारणही खास आहे म्हणा…

राष्ट्रगीताचं असं खास व्हर्जन तुम्ही आधी पाहिलं नसेल

फरदीन दुसऱ्यांदा पिता झाला आहे. त्याची पत्नी नताशा हिने एका गोंडस मुलाला जन्म दिला आहे. फरदीन आणि नाताशाला तीन वर्षांची मुलगी आहे. या गोड बातमीमुळे सध्या दोन्ही कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण आहे. गेल्या काही महिन्यांपासून नताशा आपल्या कुटुंबीयांसोबत लंडनमध्ये राहतेय. बाळाला लंडनमध्येच जन्म देण्याचा निर्णय या दोघांनी आधीच घेतला होता.

फरदीनने त्याच्या चाहत्यांना ही गोड बातमी सोशल मीडियाद्वारे दिली. ट्विटरवर यासंदर्भात सांगताना फरदीनने लिहिले की, ‘मला ११ ऑगस्ट २०१७ ला मुलगा झाला. मुलाचे नाव अझरिउस असं ठेवलंय.’

फरदीनने अभिनेत्री मुमताज यांची कन्या नताशा हिच्यासोबत २००५ मध्ये लग्न केले. १२ वर्षांपूर्वी मुंबईत शाही थाटात त्यांचा विवाहसोहळा पार पडला होता. त्यांच्या लग्नात बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. फरदीन आणि नताशाला तीन वर्षांची मुलगी असून, तिचे नाव डियानी इसाबेल खान असे आहे. फरदीनने बॉलिवूडमध्ये अनेक हिट सिनेमात काम केलेय. २०१० मध्ये आलेल्या ‘दुल्हा मिल गया’ या सिनेमात तो शेवटचा दिसला होता. यात त्याच्यासोबत शाहरुख खान आणि सुश्मिता सेनदेखील होते.

First Published on August 12, 2017 3:29 pm

Web Title: fardeen khan and wife natasha welcomed new member in the family he is a baby boy named azarius
  1. No Comments.