News Flash

VIDEO : ‘फ्लॉप अभिनेता’ आणि ‘फाटलेला आवाज’ म्हणणाऱ्या ट्रोलर्सना फरहान अख्तरचं उत्तर; म्हणाला…

नुकतंच फरहानने अभिनेता अरबाज खान याचा टॉक शो 'पिंच' च्या दुसऱ्या सिझनमध्ये हजेरी लावली.

VIDEO : ‘फ्लॉप अभिनेता’ आणि ‘फाटलेला आवाज’ म्हणणाऱ्या ट्रोलर्सना फरहान अख्तरचं उत्तर; म्हणाला…

अभिनेता आणि दिग्दर्शक फरहान अख्तर बॉलिवूडमधील एक प्रतिष्ठित अभिनेता म्हणून ओळखला जातो. फरहानने सिनेसृष्टीत अनेक चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. त्यानंतर त्याने अभिनयाकडे आपला मोर्चा वळवला. नुकतंच फरहानने अभिनेता अरबाज खान याचा टॉक शो ‘पिंच’ च्या दुसऱ्या सिझनमध्ये हजेरी लावली. येत्या भागात फरहान अख्तर या शोमध्ये हजेरी लावणार असून या खास एपिसोडचा एक प्रोमो सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना पाहायला मिळतोय. यात फरहानने ट्रोलर्सला चांगलेच खडे बोल सुनावले आहेत.

‘पिंच’ या शोच्या दुसऱ्या सिझनमध्ये अरबान खानने फरहान अख्तरला ट्रोलिंग करण्यावरुन काही प्रश्न विचारले आहे. सोशल मीडियावर फरहानबद्दल एका युजर्सने कमेंट्स करत त्याला ट्रोल केले होते. “फरहान हा फ्लॉप अभिनेता आहे. त्याने केवळ एकच चांगला चित्रपट केला आहे तो म्हणजे ‘भाग मिल्खा भाग’. विशेष म्हणजे हा चित्रपट पण स्वर्गीय मिल्खा सिंह यांच्यावर आधारित असल्यामुळे तो हिट ठरला, असे युजर्सचे म्हणणं होतं.” त्यावर फरहान म्हणाला, “या फ्लॉप अभिनेत्याच्या माध्यमातून तुम्हाला मिल्खा सिंह यांची गोष्ट पाहायला मिळाली, यातच मी खूश आहे.”तर दुसऱ्या एका युजर्सने फरहानचा आवाज फाटलेला आहे, अशी कमेंट केली होती. यावर फरहानलाही त्याचे हसू आवरता आले नाही.

अरबाज खानचे वडील सलीम खान आणि फरहान अख्तर यांचे वडील जावेद अख्तर यांची जोडी ही बॉलिवूडमधील सुपरहिट जोडी समजली जायची. मात्र काही कारणामुळे ही जोडी तुटली. या मुद्द्यावर अरबाजने फरहानला प्रश्न विचारला तेव्हा तो म्हणाला, “माझ्या आणि तुझ्या वडिलांमध्ये जे काही झाले त्याचा परिणाम आपल्या नात्यावर झाला नाही, याचा मला आनंद आहे.”

फरहान अख्तरने नुकतीच ‘जी ले जरा’ या सिनेमाची घोषणा केली आहे. फरहान या सिनेमाचं दिग्दर्शन करणार आहे. या सिनेमात तीन तरुणींची धमाल रोड ट्रीप पाहायला मिळणार आहे. या सिनेमात बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा तसचं कतरिना कैफ आणि आलिया भट्ट या अभिनेत्री मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. २०२२ सालामध्ये या सिनेमाच्या चित्रीकरणाला सुरुवात होणार आहे. त्यामुळे २०२३ सालामध्ये हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येऊ शकतो.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 6, 2021 7:17 pm

Web Title: farhan akhtar appeared on arbaaz khan talk show pinch 2 about trolling nrp 97
Next Stories
1 आईला ICU मध्ये दाखल केल्याने अक्षय कुमार लंडनहून भारतात परतला
2 शाहरुख खानच्या चित्रपटाचं पुण्यात शूटिंग ; मेट्रो कर्मचाऱ्यांसोब काढले फोटो
3 “… तर विराट कोहली माझा शिरच्छेद करेल”; अनुष्का शर्माबद्दल विचारलेल्या प्रश्नावर कुणाल कपूरचं उत्तर
Just Now!
X