वलयांकीत कलाकारानी एक सामान्य व्यक्ती म्हणूनच सामाजिक संस्थांमधून सहभाग घेणे केव्हाही चांगले, त्यामुळे त्या कलाकाराला ब-याचशा सामाजिक गोष्टींची योग्य जाणिव होते, हे फरहान अख्तर म्हणाला तेव्हा, ‘भाग मिल्खा भाग’ या चित्रपटातून त्याने भूमिका साकारल्याचा हा प्राभाव असावा असे वाटते ना?
त्याचे विचार मंथन एवढ्यावरच थांबत नाही. तर, आपण आतून बदललो तर निश्चितच आपली बाहेरच्या जगाकडे पाहण्याची दृष्टीदेखिल बदलते असेही तो अत्यंत सहजपणे सांगतो. त्रिशा स्क्रूवाला हिच्या ‘रेनडान्सर’ या संस्थेच्या वतीने आयोजित केलेल्या लाईट हाऊस प्रकल्पाबाबत माहिती देण्याच्या पत्रकार परिषदेत फरहान हे सगळं सांगत होता. याक्षणी तो फिल्मी नसल्याने हे सगळचं वेगळे ठरले.
लाईट हाऊस प्रकल्पाच्या वतीने एक नियोजनबध्द आणि विशेष असा कार्यक्रम आखला जात आहे. त्यानुसार राही महाविद्यालयीन विद्यार्थ्याना सामाजिकदृष्ट्या कार्यरत नागरिक म्हणून विकसित केले जाणार आहे. फरहान अख्तरसारख्याने अशा वेगळ्या संस्थेला प्रोत्साहन देण्यास सहभागी व्हावे हे कौतुकास्पद आहे. ‘भाग मिल्खा भाग’ मुळेही त्याच्याकडे पाहण्याची दृष्टी बदलली आहे आणि त्याच्या सांगण्याला महत्व आले आहे.