भारतात सध्या करोनाची दुसरी लाट आली आहे. गेल्या काही दिवसात करोनाचे वाढते रुग्ण पाहता आता चिंता आणखी वाढू लागली आहे. सर्वसामान्य जनतेपासून बॉलिवूड सेलिब्रिटींपर्यंत सगळे करोनाच्या विळख्यात आले आहेत. अनेकांना करोनाची औषध मिळत नाही आहेत. कोणाला ऑक्सिजन मिळत नाही तर कोणाला बेड. या बिकट परिस्थितिचा फायदा घेत अनेकांनी बनावट औषध तयार करत विकायला सुरुवात केली आहे. दरम्यान, बॉलिवूड अभिनेता फरहान अख्तरने संताप व्यक्त केला आहे.

फरहानने बनावट औषधे विकणाऱ्यांवर टीका करत एक ट्वीट केलं आहे. त्याच ट्वीट हे सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालं आहे. “मी एक बातमी पाहिले ज्यात काही लोक बनावट औषधे बनवत विकत असल्याचे दिसतं आहे. अशा कठीण प्रसंगात लोकांचा विश्वासघात करण्यासाठी तुम्हाला एका खास प्रकारचे राक्षस असणे गरजेच आहे. तुम्ही जे कोणी आहात तुम्हाला स्वत:ची लाज वाटली पाहिजे “, अशा आशयाचं ट्वीट फरहानने केलं आहे.

या आधी फरहानने एक ट्वीट केले होते. त्यात त्याने करोनाचे संक्रमण झालेल्या रुग्णांना मदत करण्यासाठी हात पुढे केला आहे. यात त्याने देशभरातील स्वयंसेवी संस्थांची नाव आणि त्यांची संपूर्ण माहिती दिली आहे. या संस्था गरजूंना ऑक्सिजन, बेड्स आणि अन्न पर्यंत सगळ्यागोष्टींती मदत करत आहेत.

आणखी वाचा : ऑक्सिजन, रुग्णवाहिका आणि अन्न; करोना रुग्णांसाठी फरहान अख्तरने पुढे केला मदतीचा हात

दरम्यान, करोना विरुद्ध लढ्यात मदत करण्यासाठी अनेक बॉलिवूड कलाकार त्यांच्या सोशल मीडिया वापरत आहेत. . अक्षय कुमार, ट्विंकल खन्ना यांनी १०० ऑक्सिजन सिलेंडर्स दान केली. तर सलमान खान फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांना जेवण पुरवत आहे.