24 February 2021

News Flash

घटस्फोटीत पत्नीच्या प्रियकराच्या ‘त्या’ फोटोवर फरहान अख्तरने दिली प्रतिक्रिया

अधुना आणि फरहानची पहिली ओळख १९९७ मध्ये एका नाइट क्लबमध्ये झाली

फरहान अख्तर आणि अधुना भबानी

फरहान अख्तर आणि अधुना भबानी यांच्यात घटस्फोट झाला असला तरी त्यांच्यातली मैत्री अजूनही कायम आहे. अधुनाने तिच्या प्रियकरासोबतचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला. या फोटोवर फरहानने प्रतिक्रिया देताना अधुना आणि तिच्या प्रियकराचे कौतुक केले आहे. बॉलिवूडची प्रसिद्ध हेअर स्टायलिस्ट आणि बी- ब्लंट सलॉनची मालकीण अधुनाने इन्स्टाग्रामवर तिचा प्रियकर निकोलो मोरियासोबत एक फोटो शेअर केला. या फोटोमध्ये अधुना निकोल आणि इतर मित्र परिवारासोबत फार आनंदी दिसत आहे. अधुनाच्या या फोटोवर कमेंट देताना फरहान म्हणाला की, ‘जर्सी छान आहे. तुम्हीही छान दिसत आहात. पण शेवटचा फोटो जास्त सुंदर आहे.’

अधुना आणि निकोलोने नुकतीच रुट्स फुटबॉल अकादमी सुरू केली. यासंदर्भातीलच हा फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केला होता. अधुना इन्स्टाग्रामवर फार सक्रीय आहे. काही दिवसांपूर्वी तिने एक कविता शेअर केली होती. तिच्या या कवितेची सिनेवर्तुळात फार चर्चा झाली होती. या कवितेत तिने पूर्वाश्रमीचा पती फरहान आणि प्रियकर निकोलोचे कौतुक केले होते. अधुना आणि फरहानची पहिली ओळख १९९७ मध्ये एका नाइट क्लबमध्ये झाली होती. तीन वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांनी २००० मध्ये लग्न केले. लग्नाच्या १५ वर्षांनंतर दोघांनी २०१६ मध्ये घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. अधुना आणि फरहानला शाक्या आणि अकीरा या दोन मुली आहेत.

फरहान अनेकदा त्याच्या अफेअरमुळे चर्चेत राहिला आहे. काही दिवसांपूर्वी त्याचे नाव अदिती राव हैदरी आणि श्रद्धा कपूरसोबत जोडले गेले होते. पण फरहान आणि श्रद्धाच्या अफेअरच्या चर्चा जास्त रंगल्या गेल्या. रॉक ऑन २ दरम्यान दोघांमध्ये घनिष्ठ मैत्री झाली. यानंतर श्रद्धा त्याच्या घरी राहायलाही गेली होती. शक्ती कपूर यांना मात्र हे नाते मान्य नाही. गेल्या वर्षी शक्ती कपूर यांनी श्रद्धाला घरी आणले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 16, 2018 6:46 pm

Web Title: farhan akhtar commented on ex wife adhuna bhabani post she is with her boyfriend
Next Stories
1 ‘मणिकर्णिका’मधील अंकिताचा लूक व्हायरल
2 Katrina Kaif ki Hichki: ‘कतरिनाचं नृत्यकौशल्य शून्य’
3 इरफान खानला न्यूरोएन्डोक्राइन ट्यूमर
Just Now!
X