अभिनेता फरहान अख्तरने भारतीय पुरुष संघाने ऑलिम्पिकमध्ये ४१ वर्षांनंतर पदक जिंकल्यानंतर विजयी पुरुष संघाऐवजी महिला संघाचं अभिनंदन केलं. फरहानने गो गर्ल्स अशी सुरुवात करत विजयाचा आनंद साजरा करणारं ट्विट केलं होतं. मात्र नंतर त्याने हे ट्विट डिलीट केलं आहे. तरी आता या चुकीच्या ट्विटचे फोटो व्हायरल झालेत.

भारतीय संघाने जर्मनीचा ५-४ असा पराभव करत तब्बल ४१ वर्षानंतर पदकाचा दुष्काळ संपवल्यानंतर अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी ट्विटर आणि सोशल मीडियावरुन भारतीय संघाचं अभिनंदन करणाऱ्या पोस्ट केल्या. फरहान अख्तरनेही अशी एक पोस्ट केली. मात्र त्याने विजेत्या पुरुष संघाला शुभेच्छा देण्याऐवजी भारतीय महिला सांघाचं कौतुक करणारं ट्विट केलं.

नक्की पाहा या पोस्ट >> हॉकी संघाचे ‘जबरा फॅन्स’; SRK, अक्षय, तापसीच्या खास पोस्ट तर अनिल कपूरला झाली वडिलांची आठवण, म्हणाला, “हा दिवस पहायला…”

फरहानला चूक लक्षात आल्यानंतर त्याने ट्विट डिलीट केलं. “गो गर्ल्स, भारतीय संघाने दाखवलेल्या लढवय्या वृत्तीचा फार अभिमान वाटतोय. त्यांनी आपल्याला चौथं पदक जिंकून दिलं आहे. भारी कामगिरी,” असं या ट्विटमध्ये फरहानने म्हटलं होतं.


हे ट्विट डिलीट केल्यानंतर फरहानने पुन्हा एक ट्विट केलं. यामध्ये त्याने, “भारतीय संघाने दाखवलेल्या लढवय्या वृत्तीचा फार अभिमान वाटतोय. त्यांनी आपल्याला चौथं पदक जिंकून दिलं आहे. भारी कामगिरी,” असं म्हटलं आहे.

मात्र या डिलीट केलेल्या ट्विटवरुन अनेकांनी फरहानला ट्रोल करण्यास सुरुवात केलीय.

१)

२)

३)

४)

५)

दरम्यान, भारताच्या या ऐतिहासिक विजयानंतर क्रीडा, राजकीय, मनोरंजन आणि सर्वच क्षेत्रांमधून हॉकीसंघावर शुभेच्छांचा वर्षाव केला जातोय.