News Flash

Photo : फरहान अख्तरचा गर्लफ्रेंडसह स्विमिंग पुलमधला फोटो व्हायरल

शिबानी आणि फरहान अनेकदा आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एकमेकांसोबतचे फोटो शेअर करत असतात.

फरहान अख्तर, शिबानी दांडेकर

अभिनेता फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकर हे दोघंही या वर्षांत विवाहबंधनात अडकणार असल्याच्या चर्चा आता बॉलिवूडमध्ये रंगू लागल्या आहेत. गेल्या काही महिन्यांपासून ही जोडी आपल्या सोशल मीडिया पोस्टमुळे वारंवार चर्चेत आहे. शिबानी आणि फरहान अनेकदा आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एकमेकांसोबतचे फोटो शेअर करताना दिसतात, तेव्हापासून या दोघांच्या नात्याची चर्चा सुरू आहे. आता फरहानने शिबानीसोबतचा आणखी एक नवा फोटो शेअर केला असून पुन्हा एकदा ही जोडी चर्चेत आली आहे.

फरहानने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या या फोटोमध्ये त्याच्यासोबत शिबानी दिसत असून हे दोघं सुट्टीचा मनमुराद आनंद घेत असल्याचं पाहायला मिळत आहे. फरहान आणि शिबानीच्या या स्विमिंगपूलमधील फोटोमुळे या दोघांमधील उत्तम बाँण्डिंग दिसून येत आहे. विशेष म्हणजे फरहानने हा फोटो शेअर केल्यानंतर तो चांगलाच व्हायरल झाला आहे.

 

View this post on Instagram

 

As long as I have you As long as you are I’ll never be lost Shine on beautiful star @shibanidandekar love you loads

A post shared by Farhan Akhtar (@faroutakhtar) on

‘तुझं माझ्यासोबत असणं ही भावनाच माझ्यासाठी खूप खास आहे. त्यामुळे शेवटपर्यंत मी असाच तुझ्यासोबत असेन. तुला कधीही माझ्यापासून दूर होऊ देणार नाही’,असं कॅप्शन फरहानने शेअर केलेल्या फोटोला दिला.

दरम्यान,फरहानने २०१७ साली त्यानं पत्नी अधुनाशी घटस्फोट घेतला. या जोडप्याला दोन मुलं देखील आहे. घटस्फोट झाल्यानंतर फरहानचं नावं श्रद्धा कपूरशी जोडलं गेलं. मात्र शक्ती कपूर यांना हे नातं मान्य नसल्यानं त्यांच्या ब्रेकअप झाल्याच्या चर्चा होत्या. त्यानंतर फरहान शिबानीला डेट करू लागला आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 14, 2019 3:46 pm

Web Title: farhan akhtar gets cosy with girlfriend shibani dandekar in swimming pool
Next Stories
1 भाजीविक्रेता ते रंगभूषाकार; संतोष गिलबिलेंची मणिकर्णिकाद्वारे बॉलिवूडमध्ये एंट्री!
2 डोंबिवली रिटर्न’चा वेगवान आणि लक्षवेधी टीजर लाँच
3 ‘ललित २०५’ मालिकेत संक्रांतीचं अनोखं सेलिब्रेशन
Just Now!
X