News Flash

रिअ‍ॅलिटी स्टार बनण्यासाठी आला आहात का? फरहानची अभय देओलवर खोचक टीका

जिंदगी ना मिलेगी दोबारावरील अभय दोओलच्या वक्तव्यावर फरहानचे उत्तर

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडमधील नेपोटीझम हा वाद पेटून उठला. अनेक कलाकारांनी बॉलिवूडमधील अनुभव शेअर करत संताप व्यक्त केला होता. अशातच अभिनेता अभय देओलने देखील त्याचा राग व्यक्त केला आहे. त्याने जिंदगी ना मिलेगी दोबारा या चित्रपटाच्या वेळी घडलेला किस्सा सांगितला होता. त्यावेळी प्रत्येक पुरस्कार सोहळ्यात त्याला आणि फरहानला मुख्य अभिनेत्याच्या नॉमिनेशनमध्ये वगळण्यात आले असल्याचे त्याने सांगितले होते. आता यावर फरहान अख्तरने उत्तर दिले आहे.

नुकताच फरहानने इंडिया टूडेला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्याला अभय देओलने केलेल्या वक्तव्यावर प्रश्न विचारण्यात आले होते. ‘तुमचा तुमच्या कामावर विश्वास असायला हवा. तुम्ही योग्य पद्धतीने तुमचे काम करायला हवे. त्यातच आनंद मिळतो. एखाद्या व्यक्तीचा फोटो किती वेळा मॅगझिनच्या कवर पेजवर आलाय किंवा वृत्तपत्राच्या पहिल्या पानावर आलाय याने काही फरक पडत नसतो. तुम्ही इंडस्ट्रीमध्ये एक चांगला अभिनेता, गायक, दिग्दर्शक बनण्यासाठी आला आहात की एखादा रिअॅलिटी स्टार बनण्यासाठी?’ असे फरहानने म्हटले आहे.

‘अभयला काय वाटले हे त्याचे वैयक्तिक मत आहे. मी यावर फार काही बोलू शकत नाही. तुमचे तुमच्या कामावर प्रेम असायला हवे’ असे फरहान पुढे म्हणाला आहे.

View this post on Instagram

“Zindagi Na Milegi Dobara”, released in 2011. Need to chant this title to myself everyday nowadays! Also a great watch when anxious or stressed. I would like to mention that almost all the award functions demoted me and Farhan from main leads, and nominated us as “supporting actors”. Hrithik and Katrina were nominated as “actors in a leading role”. So by the industry’s own logic, this was a film about a man and a woman falling in love, with the man supported by his friends for whatever decisions he takes. There are many covert and overt ways in which people in the industry lobby against you. In this case it was shamelessly overt. I of course boycotted the awards but Farhan was ok with it. #familyfareawards Very creative artwork @kalakkii

A post shared by Abhay Deol (@abhaydeol) on

अभयने काही दिवसांपूर्वी त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर जिंदगी ना मिलेगी दोबारा या चित्रपटातील एक फोटो शेअर केला होता. ‘२०११मध्ये जिंदगी ना मिलेगी दोबारा हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. आजकाल दररोज या टायटलचा जप करणे गरजेचे आहे. तुम्ही कठीण काळातही हा चित्रपट पाहू शकता. त्यावेळी प्रत्येक पुरस्कार सोहळ्यात मला आणि फरहानला मुख्य अभिनेत्याच्या नॉमिनेशनमध्ये वगळण्यात आले आणि आम्हाला फक्त सहाय्यक अभिनेता म्हणून नॉमिनेट करण्यात आले. तर हृतिक आणि कतरिनाला मुख्य भूमिकेसाठी नॉमिनेट करण्यात आले. त्यानंतर मी पुरस्कारावर बहिष्कार टाकला पण जे काही सुरु होते त्याचा फरहानला फरक पडला नाही’ असे अभयने म्हटले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 30, 2020 7:08 pm

Web Title: farhan akhtar on abhay deols take on zindagi na milegi dobara avb 95
Next Stories
1 मायकल जॅक्सनला भेटण्यासाठी अनुपम खेर यांनी तोडले होते बॅरिकेट्स
2 करण जोहरची बाजू घेणाऱ्या स्वराला ‘चापलूस’ म्हणत कंगनाचा टोला
3 ‘मला चित्रपटातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला होता’- प्रियांका चोप्रा
Just Now!
X