बरेचदा पती-पत्नी घटस्फोटानंतर एमेकांचे जानी दुश्मन असल्यासारखे वागू लागतात. समारंभात किंवा कुठेही समोरासमोर आल्यास त्या व्यक्तीला टाळणेच पसंत करतात. पण बॉलीवूडची काही घटस्फोटित जोडपी याला अपवाद आहेत. हृतिक रोशन आणि सुझान हे एकमेकांचा किती आदर करतात हे सर्वाना चांगलेच ठाऊक आहे. कंगना प्रकरणात तर सुझानने हृतिकची बाजू घेऊन सर्वाना आश्चर्याचा धक्का दिला होता.

फरहान अख्तर आणि त्याची घटस्फोटित पत्नी अधुना भबानी यांचीही काहीशी अशीच, पण जरा वेगळी कथा आहे. फरहानने अधुनाचा चर्चित प्रियकर निकोला मोरिआ याच्या छायाचित्राखाली केलेली कमेंट पाहून चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसेल. फरहानने चक्क त्याच्या घटस्फोटित पत्नीच्या चर्चित प्रियकराची प्रशंसा केली आहे. त्यांच्या ‘इन्स्टाग्राम’वरील छायाचित्राखाली ते किती छान दिसत आहेत आणि त्यांचे कपडे सुंदर आहेत, अशी कमेंट त्याने केली आहे. यावरून फरहान आणि अधुना यांच्यात घटस्फोटानंतरही सर्व काही आलबेल आहे हे सिद्ध होते. घटस्फोट झाल्यावर मुलांसाठी का होईना अधुना आणि फरहान यांनी त्यांच्यातील चांगली मैत्री आजही टिकवून ठेवली आहे.

मसक्कली