News Flash

एप्रिल किंवा मे महिन्यात फरहान-शिबानी बांधणार लग्नगाठ

खुद्द फरहाननेच यासंदर्भात वक्तव्य केलं आहे.

फरहान अख्तर, शिबानी दांडेकर

गुपचूप साखरपुडा केल्यानंतर अभिनेता फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकर मे किंवा एप्रिल महिन्यात लग्नबंधनात अडकणार आहेत. खुद्द फरहाननेच यासंदर्भात वक्तव्य केलं आहे. फरहान-शिबानी त्यांच्या सोशल मीडिया पोस्टमुळे वारंवार चर्चेत आले होते.

भूमी पेडणेकरच्या ‘टेप कास्ट सीझन 2’ या चॅट शोमध्ये फरहानने नुकतीच हजेरी लावली. या शोमधील एका खेळात भूमीने फरहानला एक आॅडिओ क्लिप ऐकवली. या क्लिपमध्ये शिबानीचा आवाज होता. शिबानी फरहानला एक प्रश्न विचारत होती. आपण कधी लग्न करतोय, एप्रिल वा मे मध्ये. कारण मी खूप संभ्रमात आहे, असा हा प्रश्न होता. शिबानीचा हा प्रश्न ऐकताच, फरहानचा चेहरा खुलला. आपण कदाचित एप्रिल वा मे महिन्यात लग्न करू शकतो, असे उत्तर त्याने दिले.

वाचा : वेब विश्वात अली फजल-किर्ती कुल्हारी सर्वाधिक लोकप्रिय

फरहान घटस्फोटीत आहे. २०१७ साली त्यानं पत्नी अधुनाशी घटस्फोट घेतला. या जोडप्याला दोन मुलं देखील आहे. फरहानच्या मुलांनीदेखील आता शिबानीसोबतच्या नात्याला हिरवा कंदील दिला असल्याचं समजत आहे. शिबानी नुकतीच फरहानची मुलं आणि कुटुंबीयांसोबत वेळ घालवताना दिसली. ‘फरहान आणि शिबानी या नात्याबद्दल खूपच गंभीर आहेत. तसेच फरहानच्या मुलांनादेखील शिबानीची सोबत आवडली त्यामुळे ते दोघंही नक्कीच पुढचा विचार करतील’, असंही त्यांच्या जवळच्या व्यक्तीने एका मुलाखतीत सांगितलं होतं.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 6, 2019 7:03 pm

Web Title: farhan akhtar says he is getting married to shibani dandekar in either april or may
Next Stories
1 आयुषमान खुराना दबंग पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत
2 बाबांची राजकन्या लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला
3 वेब विश्वात अली फजल-किर्ती कुल्हारी सर्वाधिक लोकप्रिय
Just Now!
X