08 March 2021

News Flash

‘त्या’ पोस्टमुळे फरहान- शिबानीच्या नात्याची पुन्हा एकदा चर्चा

फरहाननं शिबानीचा फोटो पोस्ट केल्यानं आता सगळ्यांच्या भुवया आश्चर्यानं उंचावल्या.

२०१५ पासून फरहान आणि शिबानी एकमेकांना ओळखतात.

गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूडमध्ये शिबानी- फरहान यांच्या नात्याची जोरदार चर्चा आहे. २०१६ मध्ये पत्नी अधुनाशी घटस्फोट घेतल्यानंतर फरहानचं नाव अभिनेत्री श्रद्धा कपूरशी जोडलं गेलं. त्यांच्या नात्याच्या चर्चा क्षमत नाही तोच फरहान आणि शिबानीच्या नात्याच्या चर्चांनाही सुरूवात झाली. काही दिवसांपूर्वीच शिबानीनं, फरहान आणि मी चांगले मित्र असल्याचं सांगत या चर्चा फेटाळून लावल्या होत्या.

पण फरहाननं नुकत्याच इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या पोस्टमुळे त्यांचं नातं पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. शिबानीच्या वाढदिवशी फरहाननं तिचा फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट करत तिला वाढदिवसाच्या भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत.

फरहाननं शिबानीचा फोटो पोस्ट केल्यानं आता सगळ्यांच्या भुवया आश्चर्यानं उंचावल्या. २०१५ पासून फरहान आणि शिबानी एकमेकांना ओळखतात. एका शोदरम्यान या दोघांमध्ये मैत्री झाली. फरहान जो शो होस्ट करत होता त्या शोचा शिबानी भाग होती़. काही दिवसांपूर्वीच लंडनमध्ये फरहान आणि शिबानीला एकत्र पाहिलं गेलं. याआधीही बऱ्याचदा दोघांना एकत्र पाहिलं गेलं. मात्र फरहानसोबतच्या रिलेशनशिपच्या चर्चा निव्वळ अफवा असल्याचं सांगत शिबानीनं डेटिंगचं वृत्त फेटाळून लावलं होतं. मात्र आता शिबानीचा फोटो शेअर करत फरहाननं तिला शुभेच्छा दिल्यानं पुन्हा एकदा त्यांच्या नात्याची चर्चा सुरू झाली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 28, 2018 3:39 pm

Web Title: farhan akhtar share photo of shibani dandekar on her birthday
Next Stories
1 स्मिताचे कार्टे… – संकर्षण कऱ्हाडे
2 एकता कपूरविषयीचं माझं मत चुकीच्या पद्धतीने मांडलं, ‘कुसूम’ फेम अभिनेत्रीची खंत
3 इतकी वर्षे बॉलिवूडमध्ये काम करुनही मला मैत्रीणच नाही – काजोल
Just Now!
X