कलाविश्वातील अनेक सेलिब्रिटी सध्या मालदीवमध्ये सुट्टी एन्जॉय करत असल्याचं दिसून येत आहे. अनेक सेलिब्रिटींनी त्यांच्या व्हेकेशनचे फोटोदेखील सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यामध्येच बॉलिवूडमधील सतत चर्चेत असलेली जोडी शिबानी दांडेकर आणि फरहान अख्तरदेखील मालदीवला गेले होते. फरहानने या व्हेकेशनमधील एक खास फोटो शेअर केला आहे.

मालदीवमध्ये सुट्टी एन्जॉय केल्यानंतर ही जोडी मुंबईत परतली आहे. मात्र, या व्हेकेशनचे काही फोटो शेअर करुन ते आठवणींना उजाळा देत आहेत. यामध्येच शिबानी आणि फरहान या दोघांनीही एकच फोटो शेअर केला आहे. यात हे दोघंही अंडरवॉटर असल्याचं दिसून येत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Farhan Akhtar (@faroutakhtar)

“ब्रीद विथ मी शिबानी दांडेकर”, असं कॅप्शन फरहानने या फोटोला दिलं आहे. फरहानची ही पोस्ट पाहिल्यानंतर शिबानीनेदेखील त्याला लगेच रिप्लाय दिला आहे.

दरम्यान, फरहान व शिबानीसोबत फरहानची मुलगी अकिरादेखील त्यांच्यासोबत होती. यावेळी तिघांनी अंडरवॉटर फोटोशूटसोबतच स्कूबा ड्रायव्हिंगदेखील केलं असून त्याचा व्हिडीओ शेअर केला आहे.