News Flash

“समाजाच्या भल्यासाठी वेळ द्या”, ट्रोल करणाऱ्यांवर फरहान भडकला

सोशल मीडियावर फरहान ट्रोल

देशात १ मेपासून अठरा वर्षांवरील सर्वांसाठी करोना लसीकरण सुरू करण्यात आलंय. यात गेल्या काही दिवसात बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी देखील लसीचा पहिला डोस घेतलाय.  यातच अभिनेता फरहान अख्तरने देखील करोना लसीचा पहिला डोस घेतला आहे. सोशल मीडियावरून फरहानने लस घेतल्याची माहिती दिली.

फरहानने अंधेरीमधील स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये सुरू असलेल्या ड्राईव्ह इन लसीकरण केंद्रात लस घेतल्याचं त्याच्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. यावरून फरहानला अनेक नेटकरांनी ट्रोल केलं. तर नेहमीप्रमाणेच फराहने देखील या ट्रोलर्सना चांगलंच उत्तर दिलंय.

ड्राईव्ह इन लसीकरण केंद्र हे केवळ ६० वर्षांवरील नागरिकांसाठी उपलब्ध आहे. फरहानचं  वय 47 असताना फरहानने या लसीकरण केंद्रावर कशी काय घेतली? असा सवाल करत नेटकरांनी त्याला ट्रोल केलं. फराहनने तो अभिनेता असल्याचा फायदा घेत या लसीकरण केंद्रात लस घेतली असा आरोप नेटकऱ्यांनी केला. मात्र यानंतर फरहानने नेटकऱ्यांना सडेतोड उत्तर दिलं.

फरहान म्हणाला, “आता ड्रॉईव्ह इन हे 45 पेक्षा अधिक वय असलेल्यांसाठी  उपलब्ध आहे. समाजात काही तरी चांगलं काम करण्यासाठी तुमचा वेळ घावला” अशा आशयाचं ट्विट करत त्याने नेटकऱ्यांना सडेतोड उत्तर दिलंय. या आधी फरहानने एक ट्विट करत लस घेतल्याची माहिती दिली होती. यात त्याने बीएमसी आणि मुंबई पोलिसांचे आभार मानले.

या ट्विटमध्ये तो म्हणाला, “या केंद्रावर आपला नंबर येण्यासाठी साधारण दोन ते तीन तास जातात. त्यामुळे कृपया संयम राखा. गरज असेल तर सोबत पाणी आणि खाण्यासाठी काही घेऊन जा. सुरक्षित रहा.” अशी माहिती फरहानने दिली.

नुकतच अभिनेत्री अंकिता लोखंडे, सोनाक्षी सिन्हा त्यासोबतच अभिनेता रितेश देशमुख त्याची पत्नी जेनेलिया यांनी करोना लसीचा पहिला डोस घेतला आहे. सोशल मीडियावर फोटो शेअर करत त्यांनी नागरिकांना लस घेण्याचं आवाहन केलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 11, 2021 11:38 am

Web Title: farhan akhtar slams back who troll him to get vaccineted on drive in center kpw 89
Next Stories
1 सोनू सूद आणि सलमान खान यांना पंतप्रधान बनवले पाहिजे – राखी सावंत
2 ‘जमाई राजा’ फेम रवी दुबे करोना पॉझिटिव्ह
3 “आता तो आपल्या घरात आलाय…माझ्या बहिणींना देखील करोना झाला”, सलमानचा खुलासा
Just Now!
X