News Flash

फरहान अख्तरचा ‘तुफान’ लूक एकदा पाहाच!

कदाचित यापूर्वी फरहानचा असा लूक तुम्ही पाहिला नसेल

फरहान अख्तर

अभिनेता फरहान अख्तर सध्या आगामी ‘तुफान’ चित्रपटाची जय्यत तयारी करत आहे. या चित्रपटात एका बॉक्सरचा संघर्ष दिसणार आहे. नुकताच या चित्रपटातील फरहानचा पहिला लूक प्रदर्शित झाला आहे. चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी ट्विट करुन ही माहिती दिली. तुफानमध्ये फरहान मुख्य भूमिकेत झळकणार आहे.

प्रदर्शित झालेल्या फोटोमध्ये फरहान बॉक्सिंगच्या रिंगणात असून या खेळाप्रतीची त्याची ओढ, जिद्द आणि संघर्ष हे त्याच्या चेहऱ्यावर दिसून येत आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन राकेश ओमप्रकाश मेहरा करत आहेत. तर फरहान अख्तर याची निर्मिती करत आहे. विशेष म्हणजे यापूर्वी ‘भाग मिल्खा भाग’ या चित्रपटाच्या निमित्ताने त्यांनी एकत्र काम केलं आहे.

वाचा : रहेने दे बेटा तुमसे नहीं हो पायेगा! ‘घोस्ट स्टोरीज’ पाहून नेटकरी हैराण

दरम्यान,राकेश ओमप्रकाश मेहरा यांचे आतापर्यंत अनेक चित्रपट सुपरहिट ठरले आहेत. प्रेक्षकांचा कल कोणत्या चित्रपटाकडे सर्वाधिक असतो हे जाणून ते चित्रपटाची निर्मिती करत असतात. ‘रंग दे बसंती’, ‘भाग मिल्खा भा’ग यासारख्या चित्रपटांमधून त्यांनी देशातील महत्वाच्या विषयांवर भाष्य केलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 2, 2020 1:02 pm

Web Title: farhan akhtar toofan film news updates first look out ssj 93
Next Stories
1 Video: बेडरुमसंदर्भातील प्रश्नावर रणवीरने असं काही उत्तर दिलं की दीपिकाही लाजली
2 महिलेच्या वेशातील या अभिनेत्याला ओळखलंत का ?
3 रहेने दे बेटा तुमसे नहीं हो पायेगा! ‘घोस्ट स्टोरीज’ पाहून नेटकरी हैराण
Just Now!
X