17 December 2017

News Flash

फरहानच्या ट्विटवर श्रद्धा म्हणाली…

श्रद्धामुळेच फरहानने अधुनाला घटस्फोट दिला असे म्हटले जाते

लोकसत्ता ऑनलाइन | Updated: June 19, 2017 10:12 PM

बॉलिवूडमध्ये कधी कोणाचं सुत कोणासोबत जुळेल आणि कधी कोणाचा कित्येक वर्षांचा संसार मोडेल हे काही सांगता येत नाही. सध्या या झगमगत्या दुनियेत सर्वात जास्त चर्चा कशाची असेल तर ती म्हणजे श्रद्धा कपूर आणि अभिनेता, दिग्दर्शक फरहान अख्तर यांच्यातील अफेअरची. श्रद्धामुळेच फरहानने अधुनाला घटस्फोट दिला आणि ते सध्या लिव्ह इनमध्ये राहत असल्याच्या बातम्या काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध झाल्या होत्या. पण आता श्रद्धाने ट्विटरवर फरहानला हार्टवाले स्माइली टाकल्या आहेत. तिच्या या स्माईलींकडेच अनेकांचं लक्ष वेधलं गेलं आहे.

‘मुन्ना माइकल’चे डिंग डँग’ गाणे पाहिले का?

त्याचे झाले असे की, श्रद्धा कपूरचा आगामी सिनेमा ‘हसीना पारकर’चा टीझर नुकताच प्रदर्शित करण्यात आला. श्रद्धानेही हा टीझर तिच्या ट्विटरवर शेअर केला. हा टिझर पाहून अनेक बॉलिवूड मंडळींनी तिचं भरभरून कौतुक केलं. त्यात अर्थात फरहान अख्तरचाही समावेश होताच. हा टीझर खूप खरा आणि नाट्यमय आहे अशी कमेंटही त्याने दिली. त्याच्या या मेसेजला धन्यवाद म्हणत श्रद्धाने हसणारे आणि हृदयाचे स्माईलीही टाकले. त्यामुळे नक्की यांच्यात काय सुरू आहे हा अनेकांच्या मनातला प्रश्न या ट्विट्समुळे अधिक वाढीस लागला.

अपूर्व लाखिया दिग्दर्शित या सिनेमात भारतीय गुन्हेगारी विश्वात दाऊद इब्राहिम या नावाची जी दहशत होती त्याचा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या त्याच्या कुटुंबियांच्या राहणीमानावर काय परिणाम झाला होता याचीच झलक ‘हसीना पारकर’ या सिनेमात दाखवण्यात आल्याचं म्हटलं जात आहे. एका बहिणीपासून सुरु झालेल्या हसीनाचा प्रवास ‘गॉडमदर’ आणि ‘गँगस्टर’पर्यंत येऊन कधी थांबला याचं प्रभावी चित्रण ‘हसीना…’ या सिनेमात पाहायला मिळणार आहे. पण, त्याआधी प्रदर्शित झालेला हा टिझर सिनेमाबद्दलची उत्सुकता आणखीनच वाढवत आहे. ‘अठ्ठासी केसेस दर्ज, पर कोर्टमे हाजरी सिर्फ एक बार’ असं म्हणत या टिझरमध्ये व्हॉईसओव्हरच्या माध्यमातून हसीनाचा त्या काळी असणारा दबदबा सर्वांसमोर आणण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

First Published on June 19, 2017 10:10 pm

Web Title: farhan akhtar wishes haseena parkar shraddha kapoor replies by supporting his social initiative