02 December 2020

News Flash

फरहान अख्तर कशासाठी करतोय ‘तुफान’ मेहनत?

रोज न चुकता व्यायाम करण्याच्या सवयीतून फरहान त्याच्या चाहत्यांना कायमच प्रेरणा देत असतो.

फरहान अख्तर

‘भाग मिल्खा भाग’च्या तुफान यशानंतर अभिनेता फरहान अख्तर आणि दिग्दर्शक राकेश ओमप्रकाश मेहरा पुन्हा एकदा एकत्र येणार आहेत.बॉक्सिंगवर आधारित एका चित्रपटावर ते काम करत आहेत.’तुफान’ असं या चित्रपटाचं नाव असून याची घोषणा फरहानने ट्विटरवर केली होती.या चित्रपटात फरहानसोबत अजून कोणते कलाकार दिसणार आहेत हे मात्र निर्मात्यांनी गुलदस्त्यात ठेवले आहे.फरहान या चित्रपटातील त्याच्या भूमिकेसाठी जोरदार तयारी करत आहे. या तयारीचे काही फोटो फरहानने सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.आपल्या निरोगी राहण्यातून,दिसण्यातून आणि न चुकता व्यायाम करण्याच्या सवयीतून फरहान त्याच्या चाहत्यांना कायमच प्रेरणा देत असतो.

फरहानाने नुकताच इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला असून त्यामध्ये तो बॉक्सिंग प्रॅक्टिस करताना दिसत आहे. या चित्रपटात एका बॉक्सरची भूमिका फरहान निभावत असल्याने,भूमिका योग्य वठवण्यासाठी तो खूप मेहनत घेत आहे.फोटो पोस्ट करत फरहानने ‘बॉक्सरलाईफ’,’पंचिंगबॅग’,’ट्रेनिंग’,’तुफान इन मेकिंग’ असे हॅशटॅग वापरले आहेत.

पी.टी.आयशी बोलताना राकेश ओमप्रकाश मेहरा म्हणाले की,” या चित्रपटासाठी मी खूप उत्सुक आहे.याविषयी मी फार बोलू शकत नाही कारण आम्ही अजून चित्रीकरण सुरु केलेलं नाहीये.मी आणि फरहान जवळपास सहा वर्षांनी एकत्र काम करणार आहोत. लेखक अंजुमन राजबली यांनी ही बॉक्सरची प्रेमकथा लिहिली आहे.ही व्यक्तिरेखा काल्पनिक आहे.या कथेचा एक वेगळा आवाज आहे.म्हणून मला ही कथा जास्त भावली.”

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 25, 2019 7:57 pm

Web Title: farhan akhtar working hard for toofan
Next Stories
1 नवऱ्यासाठी प्रियांकाने सोडलाय ‘भारत’
2 ‘अभिनय क्षेत्रातील ३५ वर्ष’, अनुपम खेर यांनी शेअर केली भावनिक पोस्ट
3 PM Narendra Modi Box Office Collection : जनतेने मोदींना स्वीकारलं तर विवेकला नाकारलं
Just Now!
X