करोना विषाणूचा वाढता संसर्ग टाळण्यासाठी देशात ३ मे पर्यंत लॉकडाउन करण्यात आलं आहे. यावेळात देशातील नागरिकांप्रमाणेच सेलिब्रिटीदेखील त्यांच्या कुटुंबासोबत वेळ घालवत आहेत. त्यासोबतच ते सोशल मीडियावरही सक्रीय राहून चाहत्यांच्या संपर्कात राहत आहेत. यावेळी ते विविध पद्धतींचा वापर करुन नागरिकांमध्ये करोनाविषयीची जनजागृती करण्याचा प्रयत्न करत आहेत. अभिनेता फरहान अख्तर यानेदेखील एक कविता सादर करत त्यातून जनजागृती करण्याचा प्रयत्न केला आहे. विशेष म्हणजे या कवितेमधून त्याने मास्क वापरणं गरजेचं का आहे हे सांगितलं आहे.

फरहानने त्याच्या ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’ या चित्रपटातील ‘तो जिंदा हो तुम’ ही कविता रिक्रिएट केलं आहे. रिक्रिएट केलेल्या या कवितेमध्ये त्याने करोना विषाणूवर भाष्य केलं आहे. यामध्ये त्याने मास्क का वापरावा, त्याचे फायदे काय हे सांगितलं आहे.

 

View this post on Instagram

 

‘Toh Zinda ho tum’ – Corona version. #laughalittle #stayhome #poemsforourtimes

A post shared by Farhan Akhtar (@faroutakhtar) on

‘चेहरों पर अगर मास्क पहन रहे हो तो जिंदा हो तुम…’असं त्याने त्याच्या कवितेतून सांगितलं आहे. सोबतच सॅनिटाइर वापरा, शिंकतांना तोंडावर हात ठेवा, गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळा अशा अनेक गोष्टी त्याने सांगितल्या आहेत.

दरम्यान, ‘तो जिंदा हो तुम’ ही कविता प्रसिद्ध गीतकार आणि फरहान अख्तरचे वडील जावेद अख्तर यांनी लिहिली आहे. ही कविता फरहान अख्तरच्या ‘जिंदगी ना मिले दोबारा’ या चित्रपटात वापरण्यात आली होती. या चित्रपटात अभिनेता हृतिक रोशन मुख्य भूमिकेत झळकला आहे.