News Flash

‘रॉक ऑन २’चा दमदार टिझर प्रदर्शित

फरहानने ट्विटरवर या सिनेमाचा टिझर पोस्ट केले आहे

फरहान अख्तर, अर्जुन रामपाल, श्रद्धा कपूर, प्राची देसाई, पुरब कोहली आणि शशांक अरोरा यांच्या ‘रॉक ऑन २’ सिनेमाचा टिझर प्रदर्शित झाले आहे. या टिझरच्या सुरुवातीलाच फरहान परत एकदा स्टेजवर येण्याचं कारण सांगतो. श्रद्धा कपूर आणि शशांक अरोरा हे नवे चेहरे या सिनेमाच्या सिक्वलमध्ये पाहायला मिळणार आहेत. नुकतेच फरहानने ट्विटरवर या सिनेमाचा टिझर पोस्ट केले आहे.
श्रद्धा या सिनेमात आपल्या आयुष्याबद्दल संभ्रमात दाखवली आहे. गाणं तिची आवड आहे पण गाणं गायचं की नाही याबाबद मात्र ती निर्णयावर पोहोचली नाही असं काहीसं या सिनेमाचं कथानक आहे. काही दिवसांपूर्वी या सिनेमाचे पहिले पोस्टर प्रदर्शित करण्यात आले. या पोस्टरमध्ये फरहान अख्तर अतिशय आक्रमक दिसत असून अर्जुन रामपाल आणि श्रध्दा कपूर यांच्या चेहऱ्यावरील भाव उत्सुकता निर्माण करणारे आहेत. ‘रॉक ऑन’ चित्रपटाचा हा पुढील भाग असला तरी पोस्टरवर तसं न लिहिता, हातांच्या दोन बोटांनी ‘रॉक ऑन’चा हा पुढील भाग आहे हे दर्शवण्याचा केलेला प्रयत्न नक्कीच वेगळा म्हणावा लागेल.
फरहानने आपल्या ट्विटरवरुन ‘रॉक ऑन- २’ चे पहिले पोस्टर ट्विट केले होते. ‘रॉक ऑन’हा सिनेमा रॉक बँडवर आधारीत होता. कलाकारांचा अभिनय आणि चांगली पटकथा यामुळे तो तरूणांच्या पसंतीस उतरला होता. त्यामुळे आता ‘रॉक ऑन- २’ मध्ये नवीन काय पाहायला मिळणार याबाबत चित्रपटरसिकांमध्ये मोठी उत्सुकता आहे. ‘रॉक ऑन’ सिनेमाची गाणीही फार गाजली होती. त्यामुळे ‘रॉक ऑन २’च्या गाण्यांबद्दलही चित्रपटरसिक आणि संगीत प्रेमींमध्ये फार उत्सुकता आहे. चित्रपटात फरहान आणि श्रद्धाने काही गाणीही गायली असल्याचं म्हटलं जात आहे. हा सिनेमा ११ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे.

Next Stories
1 चुंबन, कुंकू आणि आत्महत्या.. रेखा यांच्या आयुष्यातील काही चकित करणा-या गोष्टी
2 ‘अ डॉट कॉम मॉम’
3 ‘बाप्पासाठी कोकणातला जुना मोठा वाडा उघडला जातो’
Just Now!
X