News Flash

फॅशन डिझायनर शरबरी दत्ता यांचा संशयास्पद मृत्यू

भारतीय पारंपारिक वेशभूषांना जगतिक स्थरावर नावलौकिक मिळवून देणाऱ्या शरबरी दत्ता यांचा संशयास्पद मृत्यू

प्रसिद्ध फॅशन डिझायनर शरबरी दत्ता यांचा मृत्यू झाला आहे. त्या ६३ वर्षांच्या होत्या. कोलकातामधील राहत्या घरी बाथरुममध्ये त्यांचा मृतदेह आढळला. त्यांच्या मृत्यूचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. परंतु कार्डिअ‍ॅक अरेस्टमुळे त्यांचा मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज डॉक्टरांनी वर्तवला आहे. दरम्यान त्यांचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला आहे. पोलीस सध्या या प्रकरणाची चौकशी करत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shunyaa Sharbari Datta (@shunyaasharbaridutta) on

शरबरी दत्ता या प्रसिद्ध बंगाली कवी अजित दत्ता यांच्या कन्या होत्या. शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी युरोपमध्ये जाऊन फॅशन डिझायनिंगचं शास्त्रशुद्ध शिक्षण घेतलं होतं. लक्षवेधी बाब म्हणजे त्यांनी शिक्षण जरी विदेशात जाऊन घेतलं तरी काम मात्र भारतातच केलं. भारतीय पारंपारिक वेशभूषांना जगतिक स्थरावर नावलौकिक मिळवून देणं हे त्यांचं स्वप्न होतं. आपल्या ३० वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी अनेक बंगाली नाटकं आणि चित्रपटांसाठी वेशभूषाकार म्हणून काम केलं आहे. शरबरी दत्ता यांच्या मृत्यूमुळे कलासृष्टीत शोककळा पसरली आहे. परमा बनर्जी, उज्ज्यनी मुखर्जी, श्रबोंती चटर्जी, रुकमणि मोइत्रा, पुजारिन घोष, देबेश चटर्जी यांसारख्या अनेक कलाकारांनी सोशल मीडियाद्वारे त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 18, 2020 12:57 pm

Web Title: fashion designer sharbari dutta dies at 63 in kolkata mppg 94
Next Stories
1 ‘तुम्ही उत्तम पालक व्हाल..’; विराट-अनुष्कासाठी मोदींचं ट्विट
2 …त्यावेळी का गप्प होतात?; जया प्रदा यांचा जया बच्चन यांना सवाल
3 “उर्मिला सॉफ्ट पॉर्न करणारी अभिनेत्री नाही”; कंगनावर राम गोपाल वर्मा संतापले
Just Now!
X