जून महिन्याचा तिसरा रविवार हा जगात अनेक ठिकाणी ‘पितृ दिन’, बाबांचा दिवस म्हणून साजरा केला जातो. वास्तविक, मातृ दिन, पितृ दिन, मैत्री दिन असे ‘दिवस’ साजरे करून आपण त्या नात्यांमध्ये एक कृत्रिमता आणतो, असे अनेकांना वाटते. पण काही जणांना पितृ दिनाचे महत्त्व काही विशेष कारणांसाठी वाटते. एक तर हा पितृ दिन कुठल्याही एका विशिष्ट धर्माशी जोडलेला नाही. व्यक्ती कुठल्याही धर्माची असो, तिचे व तिच्या वडिलांचे नाते खासच असते आणि त्या खास मानवी नात्याला उजाळा देणारा म्हणून हा पितृ दिन (फादर्स डे) महत्त्वाचा.
वाचा : मी सईला पहाटे ३ वाजताही उठवतो- सागर कारंडे
आई हे आपल्यासाठी मूर्तिमंत प्रेम असतं, तर वडील म्हणजे धाक, दरारा! वडिलांशी मैत्री, जिव्हाळ्याचे नाते म्हणजे अगदी ‘ऑ’. त्यामुळे वडिलांचे मुलांवरील प्रेम बहुतांशी अव्यक्तच असते. वडील सहसा आपलं प्रेम सहजपणे ओठांवर येऊ देत नाहीत, पण म्हणून त्यांच्या हृदयात प्रेम नसतं का? तर तसं नाहीये. प्रत्येक वडिलांचं आपल्या मुलांवर प्रेम असतं. फक्त ते व्यक्त करण्याची प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असते. यंदाच्या पितृ दिनाच्या निमित्ताने आपण मराठी चित्रपटसृष्टीतील सेलिब्रिटी बाबांवर नजर टाकणार आहोत.
गिरीजा ओक आणि सुहुर्द गोडबोले यांना कबीर हा गोंडस मुलगा आहे. सुहुर्द हा श्रीरंग गोडबोले यांचा मुलगा असून तो एक निर्माता आहे.
अभिनेता सुबोध भावेला कान्हा आणि मल्हार हे दोन मुलगे आहेत.
अभिनेता सिद्धार्थ जाधवला स्वरा आणि इरा या दोन मुली आहेत.
स्वप्निल जोशीला मायरा ही मुलगी आहे.
भाऊ कदमला तीन मुली आणि एक मुलगा आहे.
देवदत्त नागेला निहार हा मुलगा आहे.
जितेंद्र जोशीला रेवा ही गोड मुलगी आहे.
भारत गणेशपुरेला एक मुलगा आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on June 16, 2017 11:02 am