News Flash

कपड्यांवरून ट्रोल करणाऱ्यांना फातिमाचं जबरदस्त उत्तर

युजरला सडेतोड उत्तर देत फातिमाने त्याला ब्लॉक केलं.

fatima sana shaikh
फातिमा सना शेख

सोशल मीडियावर ट्रोलिंगच्या घटना काही नवीन नाहीत. एखाद्याच्या मतावरून, कपड्यांवर नेटकऱ्यांकडून अनेकदा टीका होतात. विशेषत: सेलिब्रिटींना अशा प्रकारच्या ट्रोलिंगला मोठ्या प्रमाणावर सामोरं जावं लागतं. काही सेलिब्रिटी ट्रोलिंगवर मौन बाळगणं पसंत करतात तर काहीजण सडेतोड उत्तर देतात. आमिर खानच्या ‘दंगल’ या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका साकारलेली अभिनेत्री फातिमा सना शेख हिने नुकतंच ट्रोलर्सना जबरदस्त उत्तर दिलं आहे.

फातिमाने काही दिवसांपूर्वी इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला होता. या फोटोमुळे तिच्यावर ट्रोल होण्याची वेळ आली. फातिमाने परिधान केलेल्या कपड्यांमुळे नेटकऱ्यांनी तिच्यावर टीका केली. ‘रमजानचा महिना सुरु असताना तू असे कपडे कसे परिधान करू शकते,’ असा सवाल तिला ट्रोलर्सनी विचारला. त्यानंतर फातिमान आणखी एक फोटो पोस्ट केला. या फोटोवर पुन्हा एकदा युजरने तिच्या कपड्यांवरून टीका केली. यावेळी मात्र फातिमा शांत बसली नाही.

‘माझं शरीर, माझे कपडे,’ असं सडेतोड उत्तर फातिमाने त्या युजरला दिलं. इतकंच नव्हे तर तिने त्या युजरला ब्लॉकसुद्धा केलं. कपड्यांवरून फातिमा ट्रोल झाल्याची ही काही पहिलीच वेळ नाही. याआधीही तिच्यावर नेटकऱ्यांनी टीका केली होती. पण आता थेट उत्तर देऊन तिने ट्रोलर्सचे तोंड बंद केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 24, 2019 1:35 pm

Web Title: fatima sana shaikh gives a befitting reply for commenting on her body
Next Stories
1 गलती से मिस्टेक? विवेकने मोदींसाठी केले ट्विट, सलमानच्या सिनेमाचे झाले प्रमोशन
2 सुश्मिताने ‘मिस युनिव्हर्स’चा आनंद पुन्हा केला साजरा, बॉयफ्रेंडने दिलं सरप्राइज
3 चहा, पकोडे बनवत कंगनाने साजरा केला मोदींच्या विजयाचा आनंद