News Flash

“मी त्याला थोबाडीत मारली तर त्याने मला बुक्की मारली, मला काही….”- फातिमा सना शेख

तिने आपल्यासोबत घडलेला एक प्रसंग सांगितला आहे ज्यात तिचे वडील तिच्या मदतीला धावून आले.

अभिनेत्री फातिमा सना शेख हिने आपल्या फॅमिलीसंदर्भातल्या अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे. ती म्हणाली की तिचा परिवार तिचा सर्वात मोठा आधार आहे. एका मुलाखतीमध्ये तिने तिचे वडील एक खंबीर व्यक्ती असून ते तिचा खंबीर आधार असल्याचं सांगितलं आहे.

फातिमाने आपल्यासोबत घडलेला एक प्रसंग सांगितला आहे. जेव्हा एका माणसाने तिला मारलं होतं त्यावेळी तिच्या वडिलांनी कसा धडा शिकवला ते सांगितलं आहे. फातिमा जेव्हा जिमवरुन परत येत होती त्यावेळी तिला लक्षात आलं की एक माणूस तिच्याकडे एकटक पाहात आहे.

ती सांगते, “मी जिमनंतर रस्त्यावरुन चालले होते. एक मुलगा पुढे आला आणि तो माझ्याकडे एकटक पाहत होता. मग मी त्याला विचारलं की काय बघतोयस तर तो म्हणाला माझी मर्जी मला वाटेल तर मी बघेन. तर मी त्याला मार खाशील का असं विचारलं तर त्यावर तो मार असंही म्हणाला. मी त्याला थोबाडीत मारली तर त्याने मला बुक्की मारली. मला काही वेळ काही दिसतच नव्हतं. मी सर्वात आधी माझ्या वडिलांना बोलावलं आणि त्यांना घडलेला सगळा प्रसंग सांगितला. ते आणखी दोन-तीन लोकांना घेऊन आले. माझे वडील, भाऊ आणि त्यांच्या मित्रांना पाहून तो मुलगा पळून गेला”.

फातिमाने बालकलाकार म्हणूनही काम केलं आहे. तिच्या या क्षेत्रातल्या अनुभवांबद्दल बोलताना आपल्याला कास्टिंग काऊचचा सामना करावा लागल्याचंही तिने सांगितलं. ती म्हणते, “माझ्यासमोर असे अनेक प्रसंग आले की ज्यावेळी मला सांगितलं गेलं की तुला जर काम हवं असेल तर तुला शरीरसंबंध ठेवावे लागतील”. पिंकव्हिलाला दिलेल्या मुलाखतीत तिने याबद्दल सांगितलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 26, 2021 6:43 pm

Web Title: fatima sana sheikh talked about her experiences and how her father supported her vsk 98
Next Stories
1 सोनू सूदकडे २० हजारांहून अधिक लोकांनी मागितली मदत; म्हणाला,”…”
2 नुसतंच बोलबच्चन नाही तर कृतीसुद्धा; अभिनेत्री तेजस्विनी पंडितने केलं रक्तदान!
3 सुशांतच्या बहिणीने शेअर केली ‘ती’ शेवटची पोस्ट
Just Now!
X