News Flash

पुरस्कारविजेत्या ‘आरुवी’च्या हिंदी रिमेकमध्ये दंगल गर्लची वर्णी

तमिळ चित्रपटाच्या हिंदी रिमेकमध्ये दिसणार प्रमुख भूमिकेत

समीक्षकांची पसंती मिळवलेल्या 2017 सालच्या ‘आरुवी’ या चित्रपटाचा हिंदी रिमेक सध्या बनत आहे. या चित्रपटात प्रमुख भूमिकेत बॉलिवूडची दंगल गर्ल फातिमा सना शेख दिसणार आहे.

या चित्रपटाचं दिग्दर्शन ई. निवास हे करणार आहेत. निवास यांना ‘शूल’ या चित्रपटासाठी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारही मिळाला आहे. ‘आरुवी’च्या हिंदी रिमेकबद्दल बोलताना ते म्हणाले, “आरुवी ही एका हिरोची कथा नसून तो आयुष्याच्या चक्रव्युहावर मिळवलेला विजय आहे. हा चित्रपट खूप वेगळा अनुभव देणारा आहे. यासाठी फातिमा सना शेख उत्तम निवड आहे. मी या चित्रपटासाठी खूप उत्सुक आहे.”

फातिमा अनुराग बासुच्या ‘ल्युडो’ या चित्रपटात दिसली होती. आता ती आरुवीमध्ये प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. मूळ चित्रपटात आरुवी ही प्रमुख भूमिका अभिनेत्री आदिती बालन हिने साकारली होती.

हा चित्रपट सोशल सटायरवर आधारीत असल्यानं तो बॉक्स ऑफिसवर चांगलाच गाजला. वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्येही हा चित्रपट दाखवण्यात आला. प्रेक्षकांनीही या चित्रपटाला भरपूर प्रतिसाद दिला होता. या चित्रपटातली प्रमुख भूमिका ही फेमिनिझमचं प्रतिक असणारी, प्रोग्रेसिव्ह विचारांची आहे. या चित्रपटातून समाजाला आरसा दाखवण्याचं काम केलं आहे. या वर्षी या चित्रपटाचं शूटींगही सुरु होणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 5, 2021 4:05 pm

Web Title: fatima sana sheikh to be appeared in hindi remake of tamil film aaruvi vsk 98
Next Stories
1 ‘हा खूप भयानक फ्रॉड आहे’, त्या फेक पोस्टरवर सुनील शेट्टीचे स्पष्टीकरण
2 पाहा एका भूमिकेसाठी कंगनाला काय काय करावं लागत आहे….
3 कलाकारांची फौज असणारा ‘झिम्मा’ लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला
Just Now!
X