‘फर्जंद’ चित्रपटाच्या अभूतपूर्व यशानंतर लेखक-दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी ‘फत्तेशिकस्त’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आणला. शिवाजी महाराजांच्या कुशल युद्धनीतीचे दर्शन घडविणाऱ्या भारतातील पहिल्या सर्जिकल स्ट्राइकचा थरार यामध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. हा चित्रपट प्रेक्षकांना भावला असून तिकीटबारीवर याची जोरदार कमाई सुरु आहे. अवघ्या तीन दिवसांत ‘फत्तेशिकस्त’ने साडेतीन कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे.

‘फत्तेशिकस्त’च्या फेसबुक पेजवर चित्रपटाच्या कमाईची माहिती देण्यात आली आहे. प्रदर्शनाच्या दिवशी ‘फत्तेशिकस्त’ने ६५ लाख रुपये कमावले तर शनिवारी हा आकडा आणखी वाढला. शनिवारी १.१७ कोटी रुपये व रविवारी १.६८ कोटी रुपयांचा गल्ला या चित्रपटाने जमवला.

Russian missile attack kills 13 in Ukraine
रशियन क्षेपणास्त्र हल्ल्यात युक्रेनमधील १३ जण ठार
Big falls in Sensex and Nifty
सेन्सेक्स अन् निफ्टीत मोठ्या प्रमाणात पडझड; शेअर बाजाराच्या घसरणीला ‘या’ तीन गोष्टी ठरल्या कारणीभूत
chandrapur s 19 Month Old Survi Salve Enters India Book of Records
दीड वर्षाची सुरवी ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये, जाणून घ्या वैशिष्ट्य…
baltimore
US Bridge Collapse: धोक्याची सूचना देणाऱ्या भारतीय खलाशांचे जो बायडेन यांनी मानले आभार

मराठ्यांचे पराक्रमी पर्व शिवाजी महाराजांपासून सुरु होते. ‘रयतेचा राजा’ किंवा ‘जाणता राजा’ याबरोबरच महाराजांना ‘शस्त्रास्त्रशास्त्र’ पारंगत म्हटले जाते. त्यांच्या युद्धनीतीचे धडे जगभरात अनेक देशांच्या सैन्यदलांना दिले जातात. त्यांच्या कुशल युद्ध नेतृत्वाखाली मराठ्यांनी केलेल्या पहिल्या सर्जिकल स्ट्राईकची कथा ‘फत्तेशिकस्त’मध्ये उलगडली आहे.

मृणाल कुलकर्णी, चिन्मय मांडलेकर, अजय पुरकर, मृण्मयी देशपांडे, अंकित मोहन, निखिल राऊत, हरीश दुधाडे, समीर धर्माधिकारी, आस्ताद काळे, तृप्ती तोरडमल, रमेश परदेशी, अक्षय वाघमारे, विक्रम गायकवाड, रुची सावर्ण, अश्विनी कुलकर्णी, नक्षत्रा मेढेकर, प्रसाद लिमये, अमोल हिंगे, ऋषी सक्सेना यांसोबतच हिंदीतला प्रसिद्ध चेहरा अनुप सोनी यांसारख्या मातब्बर कलाकारांनी ‘फत्तेशिकस्त’मध्ये भूमिका साकारल्या आहेत.