01 June 2020

News Flash

‘फत्तेशिकस्त’च्या कलाकारांची किल्ले मोहिम

दिवाळीच्या सणादरम्यान किल्ले बांधण्याची जुनी प्रथा आहे

दिवाळी म्हणजे उत्साह, चैतन्य, आणि आनंदाचा सण. या दिवाळी सणासोबत अनेक जुन्या रूढी, परंपराही जोडल्या  गेल्या आहेत. दिवाळीच्या सणादरम्यान किल्ले बांधण्याची जुनी प्रथा आहे. लहानांसोबत मोठेही त्यात आनंदाने सहभागी होतात. या प्रथेचा धागा पकडून आगामी फत्तेशिकस्त चित्रपटाच्या कलाकारांनी किल्ले बांधणीची मोहिम हाती घेत जुन्या प्रथेला उजाळा दिला. दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर आणि चित्रपटातील कलाकारांनी किल्ले बांधणी केली.

उत्सवांच्या व्याख्या सध्या बदलत चालल्या आहेत, त्या पार्श्वभूमीवर किल्ले बनवणे हा आनंदाचा ठेवा आहे. तो आवर्जुन जपायला हवा यासाठीच आम्ही एकत्र येत या किल्ले बांधणीमध्ये आवर्जुन सहभाग घेतल्याचं चित्रपटाच्या टीमने सांगितलं.

मृणाल कुलकर्णी, चिन्मय मांडलेकर, अजय पुरकर, मृण्मयी देशपांडे, अंकित मोहन, निखिल राऊत, हरीश दुधाडे, समीर धर्माधिकारी, आस्ताद काळे, तृप्ती तोरडमल, रमेश परदेशी, अक्षय वाघमारे, विक्रम गायकवाड, रुची सावर्ण, अश्विनी कुलकर्णी, नक्षत्रा मेढेकर, प्रसाद लिमये, अमोल हिंगे, ऋषी सक्सेना, सिद्धार्थ झाडबुके यासोबत हिंदीतला प्रसिद्ध चेहरा अनुप सोनी यांसारख्या मातब्बर कलाकारांची भट्टी ‘फत्तेशिकस्त’ चित्रपटात आहे. ए.ए फिल्म्स यांच्या सहकार्याने आलमंड्स क्रिएशन्स प्रस्तुत या चित्रपटाचे दिग्दर्शन दिग्पाल लांजेकर यांचे आहे. ‘फत्तेशिकस्त’ १५ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 21, 2019 3:58 pm

Web Title: fatteshikast movie team build castles ssj 93
Next Stories
1 ..म्हणून कियाराला करावे लागले गुंडांशी दोन हात
2 ‘इंडियन २’मधील या दृश्यावर तब्बल ४० कोटींचा खर्च!
3 तानाजी मालुसरेंची शौर्यगाथा सांगणारा ‘तानाजी: द अनसंग वॉरियर’
Just Now!
X