03 August 2020

News Flash

फत्तेशिकस्तमध्ये ‘हा’ अभिनेता साकारणार बहिर्जी नाईक यांची भूमिका

हा अभिनेता अनेक मालिकांमध्ये झळकला आहे

फत्तेशिकस्त

छत्रपती शिवाजी महाराज यांचं गुप्तहेर खातं हे अतिशय कार्यक्षम असं होतं आणि या गुप्तहेर खात्याचा कणा होते त्याचे प्रमुख बहिर्जी नाईक. मराठा इतिहासातील महानायकच! आणि भारतातील गुप्तहेर संस्थेचे जनकच ! बेमालूम वेशांतर करण्याचं कसब, भाषाचातुर्य, युद्धनीती, कुटनीती आणि दुर्दम्य आत्मविश्वास असलेल्या बहिर्जींच्या अफाट कामगिरीच्या मदतीने स्वराज्याच्या असंख्य मोहिमा सफल झाल्या. याच बहिर्जी नाईक यांची दमदार भूमिका अभिनेता हरीश दुधाडे आगामी ‘फत्तेशिकस्त’ या चित्रपटात साकारणार आहे. येत्या १५ नोव्हेंबरला हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

आजवर विविधांगी भूमिका साकारत हरीश दुधाडेने रसिकांच्या मनात आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. रंगभूमी आणि छोटा पडदा गाजवल्यानंतर आता हरीशने त्याचा मोर्चा मोठ्या पडद्याकडे वळविला आहे. त्यामुळे त्याला या नव्या रुपात पाहण्यासाठी चाहते प्रचंड उत्सुक आहेत. हरीश याच्या बहुरूपी भूमिका हे चित्रपटाचे खास वैशिष्टय़ ठरणार असून चित्रपटात अघोरी, कव्वाल,पोतराज यासारख्या नऊ विविध भूमिका हरीश यांनी आपल्या खास शैलीत साकारून चित्रपटाची रंगत वाढवली आहे.

“बहिर्जी नाईक यांची भूमिका करायला मिळणे हे मी माझे भाग्य समजतो. कोणत्याही कलाकारासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका साकारायला मिळणे हे एक आव्हान असते आणि कलाकारालाही ते आव्हान स्वीकारायला आवडते. मला ‘फत्तेशिकस्त’ या चित्रपटात तशी संधी मिळाली ही नक्कीच आनंदाची बाब आहे”,असं हरीशने सांगितलं.

ए.ए फिल्म्सचे सहकार्य व आलमंड्स क्रिएशन्सची प्रस्तुती असलेल्या या चित्रपटाचे लेखन व दिग्दर्शन दिग्पाल लांजेकर यांनी केले आहे. छायांकन रेशमी सरकार तर संकलन प्रमोद कहार यांचे आहे. संगीत-पार्श्वसंगीत देवदत्त मनिषा बाजी तर गीते संतश्रेष्ठ तुकाराम महाराज, वि.स खांडेकर, दिग्पाल लांजेकर यांची आहेत. वेशभूषा पौर्णिमा ओक यांची असून रंगभूषा सानिका गाडगीळ यांची आहे. ध्वनीलेखन निखील लांजेकर यांनी केले आहे. साहस दृश्ये बब्बू खन्ना तर नृत्यदिग्दर्शन सुभाष नकाशे यांचे आहे. व्ही. एफ.एक्स इल्युजन इथीरिअल स्टुडियोज यांचे आहे. कार्यकारी निर्माता उत्कर्ष जाधव आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 17, 2019 3:35 pm

Web Title: fatteshikasta upcoming marathi movie harishi dudhane play bahirji naik role ssj 93
Next Stories
1 ‘राजी’, ‘सत्यमेव जयते’नंतर ‘मलंग’ मध्ये दिसणार अमृता खानविलकर
2 ‘केबीसी’त बच्चन समोर असतात पण ऑटोग्राफ देतात का? जाणून घ्या शो बद्दल काही गोष्टी
3 ..म्हणून मराठी कलाकार पोस्ट करत आहेत त्यांच्या लग्नाचे फोटो
Just Now!
X