करण जोहरच्या कॉफी विथ करण या चॅट शोने थोड्याच काळात प्रचंड लोकप्रियता मिळवली होती. हा शो थोड्याच भागांचा असतो यात बॉलिवूडचे दिग्गज कलाकार मंडळी आवर्जुन येतात. करण स्वतः सिनेनिर्माता आणि सुत्रसंचालक आहे. त्यामुळे त्याला ३६५ दिवस व्यस्त कसं राहायचं हे चांगलंच माहित आहे. त्याच्या या शोमध्ये यावेळी कोणकोणते कलाकार येणार हे असून कळले नसले तरी पहिला पाहूणा कोण असणार हे मात्र आता पक्क झालं आहे. पाकिस्तानी अभिनेता फवाद खान हा या शोचा पहिला पाहुणा आहे. फवाद त्याच्या लूक्स आणि अभिनयामुळे अनेकांच्या गळ्यातला ताईत बनला आहे. कपूर अॅण्ड सन्स या सिनेमातून त्याच्या अभिनयाची झलकही पाहता आली. या शोमध्ये करण कलाकारांशी बोलताना अनेकदा वादग्रस्त विधानं पाहायला मिळतात. गेल्यावर्षी सलमान खानचा वर्जिनिटीवाला किस्सा तर आठवत असेलत ना…
अभिनेत्रींमध्ये दीपिका पदुकोण आणि आलिया भट्ट यांच्यापैकी कोणाला घ्यायचे याचा अजून निर्णय झालेला नाही. कपूर अॅण्ड सन्समध्ये आलिया भट्ट आणि फवाद खान यांना एकत्र पाहिले होते. तर दीपिका आणि फवाद हे फक्त मनीष मल्होत्राच्या फॅशन शोमध्ये एकत्र आले होते. दीपिका आणि फवाद एकत्र सुंदर दिसतात. त्यामुळे पहिल्या एपिसोडमध्ये कदाचित हे दोघे पाहायला मिळू शकले. गोलमाल ४ मध्ये करिनाला वगळत आता रोहित शेट्टी दीपिकाला घेण्याचा विचार करत आहे अशा बातम्या सध्या सिनेवर्तुळात फिरत आहेत. सध्या करण त्याचा आगामी सिनेमा ए दिल है मुश्किलच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. हा सिनेमा दिवाळीमध्ये २६ ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे.