12 August 2020

News Flash

स्वप्नीलचा चिमुकला झळकणार जाहिरातीत

वयाच्या नवव्या वर्षी स्वप्नीलनं रुपेरी दुनियेत पाऊल ठेवलं, पण चिमुकल्या राघवनं मात्र एक पाऊल पुढे जात रुपेरी दुनियेत पदार्पण केलं आहे.

स्वप्नीलच्या या चिमुकल्या राघवला पाहायला त्याचे चाहतेही उत्सुकत झाले आहेत.

श्रीकृष्णाच्या भूमिकेमुळे फार कमी वयात सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलेला मराठी अभिनेता स्वप्नील जोशीचा मुलगाही आता अभिनयाच्या क्षेत्रात पाऊल ठेवणार आहे. एका जाहिरातीत राघव झळकणार आहे.

‘जॉन्सन अँण्ड जॉन्सन’च्या एका जाहिरातीत राघव त्याच्या आई-बाबांसोबत झळकणार आहे. स्वप्नीलनं सोशल मीडियावर अकाऊंटवर राघवचा फोटो शेअर करत ही माहिती दिली आहे. राघव नऊ महिन्यांचा आहे. तर स्वप्नील गेल्या २५ वर्षांपासून मराठी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. वयाच्या नवव्या वर्षी स्वप्नीलनं रुपेरी दुनियेत पाऊल ठेवलं, पण चिमुकल्या राघवनं मात्र एक पाऊल पुढे जात रुपेरी दुनियेत पदार्पण केलं आहे.

आता स्वप्नीलच्या या चिमुकल्या राघवला पाहायला त्याचे चाहतेही उत्सुक झाले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 6, 2018 6:44 pm

Web Title: featuring a little raaghav swapnil joshi in new johnson advertisement
Next Stories
1 #Stree : मुंबईच्या बसमध्येही ‘स्त्री’च राज्य
2 Rakesh Roshan birthday : …म्हणून राकेश रोशन  बिग बींबरोबर काम करणं टाळतात
3 दिग्दर्शक राम गोपाल वर्मा औरंगाबाद न्यायालयात हजर
Just Now!
X