सर्वाधिक चर्चेत असलेली अडल्ट स्टार मिया खलिफाने पॉर्न इंडस्ट्री सोडली. त्यानंतर तिच्या खासगी आयुष्यात काय बदल घडले याबाबत ‘बीबीसी’ला दिलेल्या मुलाखतीत सविस्तरपणे सांगितले. पॉर्न इंडस्ट्रीमुळे खासगी आयुष्याचे वाटोळे झाल्याची खंत मियाने या मुलाखतीत व्यक्त केली.
२०१४-१५ दरम्यान मियाने तीन महिन्यांसाठी पॉर्न इंडस्ट्रीत काम केलं होतं. मात्र इंडस्ट्री सोडल्यावरही पॉर्नस्टारचा ठपका आयुष्यभर पुसला जाणार नाही अशी खंत तिने व्यक्त केली. ”मी पॉर्नपासून कधीच दूर गेले. पण आयुष्यभर मला पॉर्नस्टार म्हणूनच समजलं जाईल. लोकांना वाटतं मी पॉर्न इंडस्ट्रीत कोट्यवधी रुपये कमावले. पण त्या कामातून मला फक्त आठ लाख रुपये मिळाले होते. ती इंडस्ट्री सोडल्यानंतर मला नोकरी शोधताना बऱ्याच अडचणी आल्या. पॉर्न इंडस्ट्री सोडून काही वर्षे झाली असली तरी आजही सार्वजनिक ठिकाणी मला लोकांच्या नजरेचा प्रचंड त्रास होतो. माझ्या कपड्यांच्या आत धुंडाळणाऱ्या नजरांमुळे मला स्वत:चीच शरम वाटते. माझ्या खासगी आयुष्याचे पुरते नुकसान झाले आहे. यासाठी मी स्वत: कारणीभूत आहे. कारण अवघ्या एका गुगल सर्चवर माझे व्हिडीओ उपलब्ध होतात,” असं ती म्हणाली.
याविषयी ती पुढे म्हणाली, ”मी स्वत:ला केवळ जगापासूनच नाही तर माझ्या कुटुंबीयांपासूनही दूर नेलं होतं. पॉर्न इंडस्ट्री सोडल्यानंतरही मी एकटीच होती. काही चुकांसाठी कधीच माफी मिळत नाही हे मला तेव्हा समजलं होतं. पण वेळ हा सर्व जखमांवर उत्तम उपाय असतो आणि आता थोड्याफार प्रमाणात का होईना गोष्टी बदलू लागल्या आहेत.”
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on September 10, 2019 2:34 pm