13 July 2020

News Flash

‘बाजीराव मस्तानी’ची संधी निसटणे हे माझे दुर्दैव- सलमान खान

करिना आणि मी 'बाजीराव मस्तानी'साठी फोटोशूटही केले होते.

'बाजीराव मस्तानी' चित्रपटात आपल्याला काम करण्याची संधी न मिळाल्याची खंत बॉलीवूडचा दबंग खान सलमानने नुकतीच बोलून दाखविली.

सध्या प्रेक्षकांपासून अगदी सेलिब्रिटींमध्येही चर्चा आहे ती म्हणजे बहुप्रतिक्षित ‘बाजीराव मस्तानी’ या भव्य चित्रपटाची. संजय लीला भन्सालीचे दिग्दर्शन असलेला हा चित्रपट मोठ्या प्रतिक्षेनंतर पुढच्या महिन्यात अखेर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात आपल्याला काम करण्याची संधी न मिळाल्याची खंत बॉलीवूडचा दबंग खान याने नुकतीच बोलून दाखविली.
सलमान आणि ऐश्वर्याला या दोघांसोबत ‘बाजीराव मस्तानी’ हा चित्रपट दिग्दर्शित करणार असल्याची घोषणा काही वर्षांपूर्वी संजय लीला भन्सालीने केली होती. मात्र, त्यावेळच्या या तथाकथित प्रेमीयुगुलामध्ये दुरावा आल्यामुळे तसे होऊ शकले नाही. त्यानंतर शाहरुख, अजय देवगण आणि हृतिक यांसारख्या बड्या कलाकारांचे नाव बाजीरावच्या भूमिकेसाठी चर्चेत होते. तर स्त्री पात्रासाठी करिना कपूरचे नाव आघाडीवर होते. मात्र, असे काहीचं झाले नाही. अखेर, प्रियांका चोप्रा आणि दीपिका पदुकोण या बॉलीवूड दीवांना काशीबाई आणि मस्तानीच्या (बाजीराव यांच्या पहिल्या आणि दुस-या पत्नी) भूमिकेकरिता घेण्यात आले. मी ‘बाजीराव मस्तानी’ चित्रपटाचा भाग नसणे हे माझे दुर्दैव समजतो. करिना आणि मी ‘बाजीराव मस्तानी’साठी फोटोशूटही केले होते. पण त्यानंतर पुढे काही झालेचं नाही. पण आता रणवीर, प्रियांका आणि दीपिकाला ट्रेलरमध्ये पाहिले. खरचं ते खूप छान दिसत आहेत आणि चित्रपटातली भव्यताही यात दिसून येतेयं.
सलमान खानचा आगामी चित्रपट ‘प्रेम रतन धन पायो’ हा दिवाळीच्या मुहुर्तावर प्रदर्शित होत असून ‘बाजीराव मस्तानी’ १८ डिसेंबरला प्रदर्शित होईल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 2, 2015 3:08 pm

Web Title: feel unfortunate to be out of bajirao mastani salman khan
Next Stories
1 कमी मानधन देणा-यांसोबत काम करु नका- सोनम कपूर
2 भारतात टोकाची असहिष्णुता – शाहरूख खान
3 पाहाः ‘फॅन’चा टीझर
Just Now!
X