News Flash

‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’चं फिमेल व्हर्जन लवकरच येणार… !!

तीन मित्रांऐवजी आता दिसणार तीन मैत्रिणी....

‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’ हा चित्रपट सगळ्यांना माहित असेलच. तीन मित्र एका रोड ट्रीपला जातात. त्यातले त्यांचे अनुभव, त्यांनी एकत्र केलेली धम्माल आणि त्यातून शिकवलेले काही धडे अशा सगळ्याचं मिश्रण असलेला हा चित्रपट होता. हृतिक रोशन, फरहान अख्तर आणि अभय देओल यांची प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट प्रेक्षकांना विशेषतः तरुण वर्गाला प्रचंड आवडला. आता याच चित्रपटासारखा अजून एक चित्रपट येणार आहे.

पण यावेळी या रोड ट्रीपमध्ये तीन मित्र नाही तर तीन मैत्रिणी दिसणार असल्याची चर्चा सध्या सुरु आहे. ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’ प्रदर्शित झाल्यानंतरच अभिनेता, दिग्दर्शक फरहान अख्तर आणि त्याची बहीण आणि दिग्दर्शक झोया यांच्यात हा चित्रपट मुलींना घेऊन बनवण्याची चर्चा सुरु होती पण आता त्यावर निर्णय झाला असल्याचं वृत्त पिंकव्हिलाने दिले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Farhan Akhtar (@faroutakhtar)

या चित्रपटाचं नाव अजून ठरायचं आहे. पण या चित्रपटाचं दिग्दर्शन फरहान करणार असल्याचं कळत आहे. तर ह्या चित्रपटाचं लेखन झोया आणि फरहान हे दोघे मिळून करणार आहेत.या चित्रपटात रोड ट्रीप तर असणारच आहे पण त्या भोवती फिरणाऱ्या बाकीच्या गोष्टी ह्या 2011 सालच्या ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’पेक्षा काहीश्या वेगळ्या असतील. तीन मैत्रिणींपैकी एक आलिया भट असेल अशी चर्चा आहे. या चित्रपटाचं काम पुढच्या वर्षी सुरु होणार असल्याची शक्यता आहे. फरहानची इतर कामं पूर्ण झाल्यावर तो या चित्रपटाकडे वळणार आहे.

ओमप्रकाश मेहरा दिग्दर्शित ‘तुफान’ या आगामी चित्रपटात फरहान दिसणार आहे. या वर्षी तो अंतराळवीर राकेश शर्मा यांचा बायोपिक ‘सारे जहाँसे अच्छा’ या चित्रपटाचं शुटिंग सुरु करेल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 4, 2021 5:41 pm

Web Title: female version of zindagi na milego dobara farhan akhtar will direct vsk 98
Next Stories
1 कंगणावर तुटून पडले दीपिकाचे चाहते; जीन्सवरुन सुरु झालेल्या वादातून ‘सोशल राडा’
2 धक्कादायक! स्टंट दरम्यान उंचीवरुन पडल्यामुळे अभिनेत्याच्या नाकाला दुखापत
3 या व्हिडीओमुळे निया पुन्हा ट्रोल; पाहा व्हिडीओ
Just Now!
X