25 September 2020

News Flash

FIFA World Cup : बिग बी, अभिषेक फुटबॉल सामना पाहण्यासाठी पोहोचले रशियात

अभिषेकनं आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून याचे काही फोटो आणि व्हिडिओही शेअर केले आहेत. फ्रान्स विरुद्ध बेल्जिअम अशी रंगलेली सेमी फायनल जवळून पाहण्याचा आनंद बिग बी

अरिना स्टेडिअममध्ये रंगलेल्या या सेमी फायनलचा आनंद पिता पुत्रांनी लुटला.

अभिषेकला असलेलं फुटबॉलचं क्रेझ काही लपून राहिलं नाही. FIFA World Cup मुळे फुटबॉल सामने पाहण्याची आयती संधी अभिषेककडे चालून आली, त्यामुळे ही संधी न गमावता अभिषेक चक्क रशियात पोहोचला आहे. विशेष म्हणजे बिग बी देखील फुटबॉल सामना पाहण्यासाठी अभिषेकसोबत रशियात गेले आहे. फ्रान्स विरुद्ध बेल्जिअम अशी रंगलेली सेमी फायनल जवळून पाहण्याचा आनंद बिग बी आणि ज्युनिअर बच्चन यांनी लुटला.

अभिषेकनं आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून याचे काही फोटो आणि व्हिडिओही शेअर केले आहेत. अरिना स्टेडिअममध्ये रंगलेल्या या सेमी फायनलचा आनंद दोघंही पिता पुत्रांनी लुटला. बिग बींनी सेमी फायनल पूर्वी काही फोटो शेअर केले होते. बच्चन कुटुंबिय सामना पाहण्यासाठी रशियात पोहोचले असावे असा अंदाज अनेकांनी व्यक्त केला होता. अखेर हा अंदाज खरा ठरला.

View this post on Instagram

#FraBel #worldcupsemifinals.

A post shared by Abhishek Bachchan (@bachchan) on

गेले काही दिवस अमिताभ बच्चन लंडनमध्ये एका चित्रपटाच्या चित्रिकरणात व्यग्र होते. हे चित्रिकरण संपवून त्यांनी नात नव्याचीही भेट घेतली. नातीसोबत काही वेळ व्यतीत केल्यानंतर बीग बी अभिषेक सोबत फुटबॉल सामना पाहण्यासाठी आले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 11, 2018 10:39 am

Web Title: fifa world cup abhishek and amitabh bachchan shared selfie from russia catching semi final match between france and belgium
Next Stories
1 आराध्याचा ‘हा’ निरागस फोटो होतोय व्हायरल
2 बऱ्याच दिवसांनंतर चाहत्यांचं लक्ष वेधतोय ‘विरुष्का’चा सेल्फी
3 ..म्हणूनच माझ्यावर टीका होते- सनी लिओनी
Just Now!
X