29 October 2020

News Flash

नागार्जुनच्या सुनेवर निशाणा साधल्यामुळे पूजा हेगडेवर चाहते नाराज

दोघींमध्येही सोशल मीडियावर वॉर सुरु होते.

‘मोहेंजो दारो’ या चित्रपटात भूमिका साकारणारी अभिनेत्री पूजा हेगडेने नुकताच इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक स्टोरी पोस्ट केली होती. या स्टोरीमध्ये तिने नागार्जुनची सून अभिनेत्री समंथा अक्किनेनीच्या लूकवर निशाणा साधला होता. त्यानंतर सोशल मीडियावर पूजाच्या या पोस्टच्या जोरदार चर्चा सुरु झाल्या. पण काही वेळातच पूजाने तिचे अकाऊंट हॅक झाल्याचे सांगितले होते. तसेच तिची टेक्निकल टीम यावर काम करत असल्याचे तिने म्हटले होते. दरम्यान समंथाचे तिच्या मैत्रीणीसोबतचे चॅट सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. या चॅटमध्ये मधून तिने अप्रत्यक्षपणे पूजाला सुनावले आहे.

पूजा हेगडेने केलेल्या पोस्टनंतर सोशल मीडियावर पूजाने समंथाची माफी मागावी अशी मागणी करत चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्याचवेळी समंथाचे दिग्दर्शिका नंदिनी रेड्डी आणि चिन्मयी श्रीपदा यांच्यात इन्स्टाग्रामवरील एका पोस्टमुळे झालेले चॅट सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्यामुळे समंथा आणि पूजामध्ये सोशल मीडियावर वॉर सुरु असल्याचे म्हटले जाते.

 

View this post on Instagram

 

#Jaanu @picchika … @eshaangirri

A post shared by Samantha Akkineni (@samantharuthprabhuoffl) on

नंदिनी यांनी २९ मे रोजी इन्स्टाग्रामवर पूजा हेगडेच्या पोस्टला उत्तर देण्यासाठी एक पोस्ट लिहिली होती. या पोस्टमध्ये त्यांनी समंथाच्या ‘ओह बेबी’ या चित्रपटातील फोटो पोस्ट केला आहे. तसेच त्यांनी फोटो शेअर करत समंथा खरच खूप सुंदर आहे आणि याच कारणामुळे चाहत्यांचे तिच्यावर प्रेम आहे. ‘समंथा तु सगळ्याच गोष्टींमध्ये छान आहेस आणि आम्ही म्हणून तुझ्यावर इतकं प्रेम करतो’ असे त्यांनी म्हटले होते.

काही वेळातच त्यांच्या या पोस्टवरव समंथा आणि गायिका चिन्मयी श्रीप्रदा यांनी कमेंट केली. ‘म्हणूनच तू माझी मैत्रीण आहेस’ असे समंथाने लिहिले तर चिन्मयीने, ‘प्लीज माझ्यावर पण प्रेम करा. मला पण गरज आहे. माझे अकाऊंट हॅक झालेले नाही’ असे तिने म्हटले. त्यावर लगेच समंथाने कमेंट करत ‘पुढच्या नोटीसपर्यंत हॅकिंगचे सर्व जोक सस्पेंड करण्यात आले आहेत’ असे म्हणत पूजाला अप्रत्यक्षपणे सुनावले. काही वेळानंतर तिघींनीही त्यांच्या कमेंट डिलीट केल्या. मात्र तोपर्यंत सोशल मीडियावर त्यांच्यामधील संवादाचा स्क्रिन शॉर्ट व्हायरल झाला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 31, 2020 6:59 pm

Web Title: fight between samantha akkineni and pooja hegde avb 95
Next Stories
1 रिंकू राजगुरुला रॅपर रफ्तारकडून खास गिफ्ट
2 अजयमुळे मी आजही अविवाहित आहे, तब्बूचा खुलासा
3 करिश्मासारखी दिसणारी ही मुलगी आहे तरी कोण?
Just Now!
X