28 February 2021

News Flash

सिनेसृष्टीतील सर्वोच्च पुरस्कार होणार रद्द?; ऑस्कर सदस्याचे धक्कादायक वक्तव्य

अ‍ॅकेडमी पुरस्कार सोहळा करोनामुळे संकटात

‘ऑस्कर’ हा सिनेसृष्टीतील सर्वोच्च पुरस्कार समजला जातो. मात्र या पुरस्कारालाही करोना विषाणूचा फटका बसला आहे. करोना विषाणूच्या वाढत्या संक्रमणामुळे यावेळचा ‘ऑस्कर’ रद्द करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अ‍ॅकेडमी संस्थेचे सदस्य डॉन हडसन यांनी व्हरायटी डॉट कॉमला दिलेल्या मुलाखतीत ऑस्कर स्पर्धेतील बदललेल्या नियमांवर भाष्य केले. यावेळी त्यांनी यंदाच्या पुरस्कार सोहळ्याबाबत काही धक्कादायक अंदाजही वर्तवले.

अवश्य पाहा – “हिटलर दिसतोय मग चर्चिल का नाही?”; ब्रिटनचे माजी पंतप्रधान गुगलवरुन गायब

अवश्य पाहा – सुशांतच्या आत्महत्येमुळे सनी लिओनीला बसला जबरदस्त धक्का; म्हणाली…

काय म्हणाले हडसन?

“ऑस्कर पुरस्कांरासाठी जगभरातील चित्रपटांचा विचार केला जातो. मात्र यावेळी जगात करोना विषाणूने थैमान घातले आहे. परिणामी सिनेसृष्टी पुर्णपणे ठप्प पडली आहे. काही चित्रपट ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित केले जात आहेत. त्यामुळे यंदाच्या वर्षी ऑस्कर नामांकनासाठी OTT वरील चित्रपटांचाही विचार केला जाणार आहे. परंतु यासाठी ऑस्करच्या मुलभूत नियमांमध्ये बदल करावा लागेल. कारण नियमानुसार केवळ सिनेमागृहांमध्येच प्रदर्शित झालेले चित्रपट ऑस्करसाठी पात्र ठरतात. या नव्या नियमांवर अ‍ॅकेडमी संस्थेचे काही सदस्य काम करत आहेत. परंतु हे सर्व प्रयोग तेव्हाच यशस्वी ठरतील जेव्हा करोना विषाणू नियंत्रणात येईल. परिस्थिती सामान्य होईल. आणि प्रेक्षक पुन्हा सिनेमागृहांच्या दिशेने जातील. असं जर घडलं नाही तर यावेळचा ऑस्कर सोहळा रद्द देखील केला जाऊ शकतो.” असा धक्कादायक खुलासा हडसन यांनी केला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 15, 2020 1:56 pm

Web Title: film academy considering postponing 2021 oscars mppg 94
Next Stories
1 सुशांतने आत्महत्या करण्यापूर्वी नेमकं काय घडलं?
2 सुशांतच्या आत्महत्येमुळे सनी लिओनीला बसला जबरदस्त धक्का; म्हणाली…
3 तुम्हाला माहितीय का…? सुशांतने थेट चंद्रावर घेतली होती जमीन
Just Now!
X