News Flash

‘ब्लॅक’ चित्रपटात बिग बींसोबत दिसलेली ही लहान मुलगी आता दिसते खूपच सुंदर; पाहून थक्क व्हाल

१६ वर्षांपूर्वी रिलीज झालेल्या 'ब्लॅक' चित्रपटात राणी मुखर्जीच्या लहानपणीची भूमिका साकारली होती. आज ती पूर्वीपेक्षाही जास्त सुंदर दिसतेय.

चित्रपट सृष्टीत अनेक बालकलाकार पुढे चालून अभिनय क्षेत्रात नाव कमावतात. काही बालकलाकार आपल्या अभिनयाने अशी छाप पाडतात की त्या भूमिका कायम स्मरणात राहतात व त्यामुळेच त्यांना पुढे काम करण्याची संधी मिळत असते. ‘ब्लॅक’ चित्रपटातील छोटी राणी मुखर्जी आठवते का तुम्हाला? अमिताभ- राणी मुखर्जीशिवाय या चित्रपटात लहानश्या मुलीनं आपल्या अभिनयाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. आयशा कपूर असे त्या लहानश्या मुलीचं नाव आहे. आता ती २६ वर्षांची असून तिला ओळखणं सुद्धा खूप अवघड आहे. गेल्या २६ वर्षांत तिचा लूकही खूप बदलला आहे.

१६ वर्षांपूर्वी महानायक अमिताभ बच्चन आणि अभिनेत्री राणी मुखर्जी यांचा ‘ब्लॅक’ चित्रपट खूप गाजला होता. या चित्रपटात आयशा कपूरने राणी मुखर्जीच्या लहानपणीची भूमिका केली. या चित्रपटातून आयशाला बरीच ओळख मिळाली. चित्रपटात साधी दिसणारी आयशा आपल्या खऱ्या जीवनामध्ये पूर्वीपेक्षा खूपच हॉट आणि सुंदर आहे.

 

महानायक अमिताभ बच्चन यांना सुद्धा दिली होती टक्कर

‘ब्लॅक’ चित्रपटात या लहानश्या मुलीनं आपल्या दमदार अभिनयाची जादू पसरवली होती. आयशा त्यावेळी अवघ्या ११ वर्षाची होती आणि इतक्या लहानश्या वयात तिनं आपल्या अभिनयाने चक्क बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांना देखील टक्कर दिली होती. या चित्रपटातील अभिनयासाठी तिला बेस्ट सपोर्टिंग अ‍ॅक्ट्रेसचा पुरस्कार देखील मिळाला होता. आयशा आता मोठी झालीय आणि चित्रपटांमध्ये काम करण्यासाठी देखील तिची तयारी आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ayesha Kapur (@ayeshakapur)

आयशा कपूरने कोलंबिया विद्यापीठातून पदवीपर्यंतचं शिक्षण पूर्ण केलंय. आयशाची आई जर्मन आहे तर वडील एक सुप्रसिद्ध उद्योजक आहेत. तिच्या वडिलांचा लेदर बॅग्सचा इंटरनॅशनल ब्रॅंड हाईडिजाइनचा व्यवसाय आहे. याशिवाय आयशाला एक सख्खा भाऊ मिलन आणि आकाश आणि विकास हे दोन सावत्र भाऊ आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ayesha Kapur (@ayeshakapur)

‘ब्लॅक’ चित्रपटासाठी आयशा कपूर सोबतच आलिया भट्टने सुद्धा ऑडिशन दिलं होतं. पण यात आयशा कपूरची निवड करण्यात आली होती. या चित्रपटापासून तिचे नशीब पूर्ण पणे बदलून गेले. चित्रपटाच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत या सिनेमात तिने चांगला अभिनय केला आहे. या चित्रपटानंतर तिने ‘सिकंदर’ चित्रपटात सुद्धा काम केलं होतं. हा चित्रपट २००९ साली रिलीज झाला होता. पण त्यानंतर आयशा फिल्मी दुनियेतून गायब झाली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ayesha Kapur (@ayeshakapur)

आयशा कपूर सध्या एका ज्वेलरी ब्रॅण्डसोबत काम करतेय. या ब्रॅण्डमध्ये ज्वेलरी तयार करण्याची काम केली जातात. आयशा एक अभिनेत्री आणि उद्योजिका तर आहेच, पण ती एक उत्तम लेखिका सुद्धा आहे. ती स्वतःचा एक ब्लॉग सुद्धा लिहित असते आणि यावर तिचे प्रचंड फॉलोअर्स सुद्धा आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ayesha Kapur (@ayeshakapur)

आयशा तिच्या इन्स्टाग्राम अकाउंवर सुद्धा बरीच सक्रिय असते. कधी योगा तर कधी फोटोशूट करत ती आपले वेगवेगळे फोटोज शेअर करत असते. या फोटोंमध्ये तिच्या चेहऱ्यावर तिच्या लहानपणीचा तोच निरागसपणा दिसून येतोय. मिळालेल्या माहितीनुसार ती सध्या अदम ओबेरॉयला डेट करतेय. त्याच्यासोबत अनेकदा तिने फोटोज देखील शेअर केले आहेत. पहा आयशाची जुनी पोस्ट…

 

View this post on Instagram

 

A post shared by Ayesha Kapur (@ayeshakapur)

तिचे लाखो फॅन्स तिच्या फोटोंना खूप पसंत करतात. तुम्ही स्वतः पाहू शकतात आयशा आता किती सुंदर आणि आकर्षक दिसत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 17, 2021 11:08 pm

Web Title: film black child artist ayesha kapur who played rani mukerji childhood role in movie prp 93
Next Stories
1 कंगना रनौतला ‘दीदी’ म्हणाला केआरके, ट्रोल झाल्यानंतर दिलं ‘हे’ उत्तर
2 कियारा अडवाणीला साकारायची आहे मधुबालाची भूमिका !
3 संपत्तीच्या वादातून आईचं अपहरण केल्याचा अभिनेत्रीचा आरोप; पंतप्रधानांकडे मागितली मदत
Just Now!
X