25 April 2019

News Flash

Video : बहुचर्चित ‘कॅप्टन मार्वल’चा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला

हा चित्रपट पुढील वर्षी ८ मार्च २०१९ मध्ये प्रदर्शित होणार आहे.

‘मार्वल कॉमिक्स’मधील कॅरल डेन्वर्सच्या व्यक्तीरेखेवर आधारित ‘कॅप्टन मार्वल’ हा चित्रपट लवकरच भारतात प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट इंग्रजीसह हिंदी,तामिळ,तेलुगु आणि मल्याळम या भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. तत्पूर्वी या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. या ट्रेलरमध्ये भव्य आणि साहसी दृष्यांचा समावेश करण्यात आल्यामुळे तो प्रेक्षकांच्या पसंतीत उतरत आहे.

मार्वल स्टुडिओने २०१३ पासून या चित्रपटाच्या निर्मिताला सुरुवात केली असून तो पुढील वर्षी ८ मार्च २०१९मध्ये प्रदर्शित होणार आहे.अॅक्शन्स आणि कल्पनेची भरारी असलेल्या या चित्रपटामध्ये डेन्वर्सच्या भूमिकेसाठी लार्सनची निवड करण्यात आली आहे. बोडन आणि फ्लेक दिग्दर्शित या चित्रपटासाठी संपूर्ण टीमने चित्रपटासाठी प्रचंड मेहनत घेतली आहे.

दरम्यान, प्रदर्शित झालेला ट्रेलरमध्ये मोठ्या प्रमाणावर साहसदृश्यांचा समावेश करण्यात आला असून यात भव्य सेट उभारण्यात आल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे सध्या या चित्रपट चर्चेचा विषय ठरत असून या ट्रेलरमुळे चाहत्यांची चित्रपटाविषयीची उत्कंठा वाढत असल्याचं पाहायला मिळत आहे.

First Published on December 6, 2018 2:16 pm

Web Title: film captain marvel trailer release