16 February 2019

News Flash

VIDEO : आता मुंबईला अजाबात घाबरायचं न्हाय…, ‘न्यूड’चा ट्रेलर पाहिलात का?

'हर इन्सान मे खुदा होता है, और खुदा मे इन्सान'

न्यूड

‘हर इन्सान मे खुदा होता है, और खुदा मे इन्सान’ नसिरूद्दीन शहा यांच्या या दमदार संवादाने ‘न्यूड’ या मराठी चित्रपटाच्या ट्रेलरची सुरुवात होते. प्रपंचाचा गाडा पुढे रेटत असतानाच असा काही प्रसंग समोर उभा ठाकतो की ज्यामुळे शेवटी नशिबाशीच दोन हात करण्याचा निर्णय त्या आईला घ्यावा लागतो. हाच निर्णय तिला मायानगरी मुंबईत आणून सोडतो आणि खऱ्या अर्थाने न्यूडचा प्रवास सुरु होतो. रवी जाधव दिग्दर्शित हा चित्रपट खऱ्या अर्थाने दुर्लक्षित पण तितक्याच महत्त्वाच्या अशा मुद्द्यावर प्रकाश टाकत आहे.

वास्तवदर्शी चित्रपट साकारण्याचा अट्टहास असणाऱ्या रवी जाधवला ‘न्यूड’च्या निमित्ताने कलाकारांचीही चांगलीच साथ मिळाल्याचं लक्षात येत आहे. ट्रेलरमधील प्रत्येक संवाद काळजाचा ठाव घेत असून, एका वेगळ्याच विश्वात आपल्याला सोडत आहे. ‘बेटा…. कपडा जिस्म पे पहनाया जाता है, रुह पे नही’, हे वाक्य काळजाला भिडतंय. मुळात ते वाक्य म्हणणाऱ्या, एका चित्रकाराच्या भूमिकेत दिसणाऱ्या नसिरुद्दीन शाह यांनी ते अधिक प्रभावीपणे पेक्षाकांपर्यंत पोहोचवलं आहे.

वाचा : राधिका आपटेला का करावा लागला फोन सेक्स?

रवी जाधवचा हा आगामी चित्रपट २७ एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. न्यूड मॉडेलच्या आयुष्यावर भाष्य करणाऱ्या या चित्रपटातून तो पुन्हा एकदा अनोख्या कथानकाला मोठ्या पडद्यावर जिवंत करणार आहे हे नक्की. तेव्हा आता ‘न्यूड’ तिच्या संघर्षाच्या कथेला न्याय देणार का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

First Published on March 27, 2018 11:23 am

Web Title: film director ravi jadhav shares marathi movie nude trailer watch video