News Flash

तुम्ही त्या लोकांचं ऐकू नका.. बिग बींचा पत्राद्वारे नातींना बहुमोल सल्ला

लग्नाबद्दलही काही सल्ले त्यांनी या पत्रातून दिले

बॉलिवूडचे ‘शहेनशहा’ अमिताभ बच्चन यांनी आपल्या १८ वर्षांची नात नव्या नवेली आणि चार वर्षांची नात आराध्याला एक खुलं पत्र लिहिलं आहे. ७३ वर्षीय अमिताभ बच्चन यांनी दोघींना आयुष्याचा बहुमोल सल्ला दिला आहे. त्या प्रसिद्ध परिवाराच्या केवळ वारसच नसून त्या मुलीसुद्धा आहेत. मुलगी असल्यामुळे अनेकजण त्यांना कसे जगले पाहिजे हेही सांगतील. अमिताभ यांची मुलगी श्वेता बच्चन आणि निखिल नंदा यांची नव्या ही मुलगी आहे. तर आराध्या अभिषेक आणि ऐश्वर्या यांची मुलगी आहे. अमिताभ बच्चन यांनी त्यांचा एक फोटो ट्विटरवर शेअर केला आणि म्हणाले की, ते हे पत्र लिहित आहेत कारण त्यांना पत्र लिहावसं वाटलं.
अमिताभ बच्चन यांनी या खुल्या पत्रात नव्या आणि आराध्याला सांगितले की, ‘तुम्ही त्या लोकांचं ऐकू नका जे तुम्हाला सांगतील की कसे कपडे घातले पाहिजेत, तुम्ही कसं वागलं पाहिजे, तुम्ही कोणाला भेटलं पाहिजे आणि तुम्ही कुठे गेला पाहिजेत.’ अमिताभ बच्चन यांनी आपल्या नातींना सल्ला दिला की, तू घातलेल्या स्कर्टवरुन तुझं चरित्र कळतं, असं जर कोणी तुम्हाला म्हणाले तर त्या व्यक्तीचे अजिबात ऐकू नका. याशिवाय लग्नाबद्दलही त्यांनी काही सल्ले त्यांना या पत्रातून दिले. अमिताभ यांनी लिहिले की, ‘तुम्ही तेव्हाच लग्न करा जेव्हा तुम्हाला करावंस वाटेल. आपला मित्र-परिवार तुम्ही स्वतः निवडा याशिवाय स्वतःचे निर्णय स्वतः घ्या, लोकं तुमच्याबद्दल बोलतील पण त्यांचे ऐकू नका.’
अमिताभ यांचा आगामी सिनेमा पिंक हा महिलांना ज्या सामाजिक समस्यांना तोंड द्यावे लागते त्यावर आधारित आहे. या सिनेमात दाक्षिणात्य अभिनेत्री तापसी पन्नू हिची मुख्य भूमिका आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन अनिरुद्ध रॉय चौधरी यांनी केले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 5, 2016 4:38 pm

Web Title: film superstar amitabh bachchan wrote a open letter to navya naveli and aradhya bachchan said them to make their own choices in life
Next Stories
1 पूनम पांडेच्या ‘द विकेन्ड’ लघुपटाचा ट्रेलर प्रदर्शित
2 ‘रॉक ऑन २’चा दमदार टिझर प्रदर्शित
3 चुंबन, कुंकू आणि आत्महत्या.. रेखा यांच्या आयुष्यातील काही चकित करणा-या गोष्टी
Just Now!
X