बॉलिवूड कलाकार आणि त्यांच्या कामाला मिळणारी दाद म्हणजेच पुरस्कार. प्रेक्षकांच्या उदंड प्रतिसादासोबतच चित्रपटसृष्टीत काम करणाऱ्या आणि आपल्या कलेचं योगदान देणाऱ्या या कलाकारांच्या दृष्टीने पुरस्कारांचे अनन्य साधारण महत्त्व असते. असाच एक मानाचा पुरस्कार सोहळा नुकताच पार पडला. चित्रपटसृष्टीतील कलाकार आणि तंत्रज्ञांचा गौरव करत ‘फिल्मफेअर पुरस्कार २०१७’ हा दिमाखदार सोहळा नुकताच पार पडला. बॉलीवूडमधील मानाची समजली जाणारी ब्लॅक लेडी आपल्या घरी घेऊन जाण्यासाठी प्रत्येक कलाकार उत्सुक असतो. मुंबईत शनिवारी रात्री ६२ वा फिल्मफेअर पुरस्कार सोहळा पार पाडला. या पुरस्कार सोहळ्यात आमिरचीच दंगल पाहावयास मिळाली. सर्वोत्कृष्ट अभिनेता, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक आणि सर्वोत्कृष्ट चित्रपट हे महत्त्तवाचे पुरस्कार दंगलच्या पारड्यात गेले. अभिनेता सलमान खान आणि दिग्दर्शक-निर्माता करण जोहर यांनी पुरस्कार सोहळ्याचे सूत्रसंचालन केले. बी टाऊनमधील विविध कलाकार आणि त्यांचे फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलेच चर्चेत आहेत. पुरस्कार सोहळ्यांची रंगत आणि कलाकारांचे धम्माल परफॉर्मन्सेस यांच्या जोडीनेच प्रेक्षकांनी उत्सुकता आहे ती म्हणजे कोणत्या कलाकाराच्या वाट्याला कोणता पुरस्कार आला याबबतची.

विजेत्यांची संपूर्ण यादीसर्वोत्कृष्ट चित्रपट- दंगल
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक- नितेश तिवारी (दंगल)
सर्वोत्कृष्ट अभिनेता- आमिर खान (दंगल)
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री- आलिया भट्ट (उडता पंजाब)
सर्वोत्कृष्ट पदार्पण अभिनेता- दिलजीत दोसांज (उडता पंजाब)
सर्वोत्कृष्ट पदार्पण अभिनेत्री- रितीका सिंग (साला खडूस)
सर्वोत्कृष्ट चित्रपट (प्रेक्षकांची निवड)- खामखा
सर्वोत्कृष्ट लघुपट (फिक्शन)- चटणी
सर्वोत्कृष्ट लघुपट (नॉन फिक्शन)- मातीतली कुस्ती
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (लघुटप)- तिस्का चोप्रा (चटणी)
सर्वोत्कृष्ट संवाद- रितेश शाह (पिंक)
सर्वोत्कृष्ट पटकथा- शकुण बत्रा, आएशा देवित्रे ढिल्लोन (कपूर अॅण्ड सन्स)
सर्वोत्कृष्ट सहकलाकार (अभिनेता)- ऋषी कपूर (कपूर अॅण्ड सन्स)

सर्वोत्कृष्ट सहकलाकार (अभिनेत्री)- शबाना आझमी (नीरजा)

फिल्मफेअर जीवनगौरव पुरस्कार- शत्रुघ्न सिन्हा
सर्वोत्कृष्ट संगीत- प्रितम (ऐ दिल है मुश्किल)
सर्वोत्कृष्ट गीतकार- अमिताभ भट्टाचार्य (ऐ दिल है मुश्किल ‘चन्ना मेरेया’)

सर्वोत्कृष्ट गायक- अरिजीत सिंग (ऐ दिल है मुश्किल शीर्षक गीत)

सर्वोत्कृष्ट गायिका- नेहा भसिन (सुलतान ‘जग घुमिया’)

सर्वोत्कृष्ट वीएफएक्स- फॅन

सर्वोत्कृष्ट एडिटिंग- मोनिष बालदवा (नीरजा)

सर्वोत्कृष्ट वेशभूषा- पायल सलुजा (उडता पंजाब)
सर्वोत्कृष्ट साहसदृश्य- श्याम कौशल (दंगल)
सर्वोत्कृष्ट नृत्य दिग्दर्शन- आदिल शेख (कपूर अॅण्ड सन्स ‘कर गयी चुल’)

समीक्षक पुरस्कार
सर्वोत्कृष्ट चित्रपट- नीरजा
सर्वोत्कृष्ट अभिनेता- मनोज वाजपेयी (अलिगढ), शाहिद कपूर (उडता पंजाब)
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री- सोनम कपूर (नीरजा)