बॉलिवूडमध्ये फिल्मफेअरला फार महत्त्व आहे. या वर्षी ६३ व्या जियो फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात कलाकारांच्या ग्लॅमरस अदांचीच चर्चा फार झाली. या सोहळ्याला शाहरुख खानपासून ते अक्षय कुमारपर्यंत आणि आलिया भट्टपासून ते सोनम कपूरपर्यंत साऱ्यांनीच हजेरी लावली होती. पण या संपूर्ण सोहळ्यात सगळ्यांचे लक्ष लागून राहिलेले ती एकमेव व्यक्ती म्हणजे रणवीर सिंग. त्याने सोहळ्यासाठी घातलेला सूट हा त्या रात्रीचा चर्चेचा विषय होता. ८० आणि ९० च्या दशकातील त्याच्या आवडत्या सिनेमांचे पोस्टर त्याच्या पॅन्ट आणि कोटवर छापलेले दिसत होते. सध्या रणवीर आणि मानुषी छिल्लरचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या दोघांचा फोटो पाहून लवकरच त्यांनी एखादा सिनेमा एकत्र करावा अशी चाहत्यांची अपेक्षा आहे. मानुषीने या पुरस्कार सोहळ्यात शाहरुख खान, रणवीर सिंगसोबत डान्स केला.

रणवीरच्या आगामी सिनेमांबद्दल बोलायचे झाले तर, येत्या २५ जानेवारीला त्याचा बहुप्रतिक्षित ‘पद्मावत’ सिनेमा प्रदर्शित होत आहे. या सिनेमात त्याने अलाउद्दीन खिल्जी ही खलनायकी व्यक्तिरेखा साकारली आहे. राणी पद्मावतीला या सिनेमात चुकीच्या पद्धतीने दाखवण्यात आले असल्याचा आरोप करणी सेनेकडून केला जात आहे. संजय लीला भन्साळी दिग्दर्शित हा सिनेमा प्रदर्शित करण्यास सर्वोच्च न्यायालयाने हिरवा कंदील दिला असला तरी अनेक संघटना या सिनेमाचा देशभर विरोध करत आहेत.

https://www.instagram.com/p/BeLg_ZrFGK1/

येत्या २५ तारखेला जर हा सिनेमा प्रदर्शित झाला तर देश बंदचे आवाहन करणी सेनेने केले आहे. रणवीर सिंगसोबत दीपिका पदुकोण आणि शाहिद कपूर यांच्या मुख्य भूमिका या सिनेमात आहेत. यानंतर रणवीर झोया अख्तर दिग्दर्शिक ‘गली बॉय’ सिनेमात दिसणार आहे. सध्या या सिनेमाचे चित्रीकरण मुंबईत सुरू असून रणवीरसोबत आलिया भट्टची मुख्य भूमिका यात आहे.

https://www.instagram.com/p/BeLdhyvl5Xg/