28 February 2021

News Flash

Filmfare Awards 2018 winners list : ‘हिंदी मीडियम’सह विद्याच्या ‘सुलू’ने फिल्मफेअर पुरस्कारांमध्ये मारली बाजी

जाणून घ्या यंदाच्या फिल्मफेअर पुरस्कारांवर राहिले कोणाचे वर्चस्व...

फिल्मफेअर

समर्पक वृत्तीने काम करणाऱ्या प्रत्येक कलाकारासाठी पुरस्कारांच्या रूपाने मिळालेली पोचपावती खूप महत्त्वाची असते. वर्षभर प्रेक्षकांचं अविरत मनोरंजन करणाऱ्या या कलाकारांच्या कलेची दाद देण्यासाठी बऱ्याच पुरस्कार सोहळ्यांचं आयोजनही केलं जातं. पण, यामध्ये एका पुरस्कार सोहळ्याचं स्थान विशेष आहे. तो पुरस्कार सोहळा म्हणजे, फिल्मफेअर. असा बहुप्रतिक्षीत फिल्मफेअर पुरस्कार सोहळा नुकताच मुंबईत पार पडला. २०१७ या वर्षात सादर करण्यात आलेल्या कलाकृतींचा गौरव करण्यासाठी यावेळी संपूर्ण कलाविश्वाने हजेरी लावली होती.

यंदाच्या ६३ व्या जिओ फिल्मफेअरच्या सूत्रसंचालनाची धुरा किंग खान, अभिनेता शाहरुख खान आणि निर्माता- दिग्दर्शक करण जोहर यांनी सांभाळली होती. सोशल मीडियावरही या पुरस्कार सोहळ्याचे पडसाद पाहायला मिळाले. सेलिब्रिटींच्या स्टाईल स्टेटमेंटपासून ते रेड कार्पेटवर हे कलाकार कोणासोबत आले इथपर्यंतच्या चर्चा रंगल्या. या चर्चांमध्ये अग्रस्थानी असणारा विषय ठरला तो म्हणजे कोणत्या पुरस्कारावर कोणाचं नाव कोरलं गेलं याच्या. चला तर मग नजर टाकूया ६३ व्या जिओ फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यातील सर्व विजेत्यांच्या यादीवर…

सर्वोत्कृष्ट चित्रपट- हिंदी मीडियम
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक- अश्विनी अय्यर तिवारी (बरेली की बर्फी)

सर्वोत्कृष्ट अभिनेता- इरफान खान (हिंदी मीडियम)

सर्वोत्कृष्ट अभिनेत्री- विद्या बालन (तुम्हारी सुलू)

सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता- राजकुमार राव (बरेली की बर्फी)

सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री- मेहेर विज (सिक्रेट सुपरस्टार)
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन पदार्पण- कोंकणा सेन शर्मा (अ डेथ इन द गूंज)
सर्वोत्कृष्ट संगीत- जग्गा जासूस
सर्वोत्कृष्ट गीतकार- अमिताभ भट्टाचार्य (उल्लू का पठ्ठा)
सर्वोत्कृष्ट गायक- अरिजित सिंग (रोके ना रुके नैना- बद्रीनाथ की दुल्हनिया)
सर्वोत्कृष्ट गायिका- मेघना मिश्रा (नचदी फिरा – सिक्रेट सुपरस्टार)
जीवनगौरव पुरस्कार- माला सिन्हा, बप्पी लहिरी
सर्वोत्कृष्ट मूळ कथा- अमित मसुरकर (न्यूटन)
सर्वोत्कृष्ट संवाद- हितेश केवलया (शुभ मंगल सावधान)
सर्वोत्कृष्ट पटकथा- शुभाषिश भुतियानी (मुक्ती भवन)
सर्वोत्कृष्ट अॅक्शन- टॉम स्ट्रथर्स (टायगर जिंदा है)
सर्वोत्कृष्ट पार्श्वसंगीत- प्रितम (जग्गा जासूस)
सर्वोत्कृष्ट प्रॉडक्शन डिझाईन- पारुल सोंध (डॅडी)
सर्वोत्कृष्ट वेशभूषा- रोहित चतुर्वेदी (अ डेथ इन द गूंज)
सर्वोत्कृष्ट ध्वनिमुद्रण- अनिश जॉन (ट्रॅप्ड)
सर्वोत्कृष्ट संकलन- नितीन बैद (ट्रॅप्ड)
सर्वोत्कृष्ट नृत्यदिग्दर्शन- विजय गांगुली, रुएल दुसाम वरिंदीयानी (गल्ती से मिस्टेक- जग्गा जासूस)
सर्वोत्कृष्ट छायांकन- स्रिशा रॉय (अ डेथ इन द गुंज)

समीक्षक पुरस्कार
सर्वोत्कृष्ट चित्रपट- न्यूटन
सर्वोत्कृष्ट अभिनेता- राजकुमार राव (ट्रॅप्ड)
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री- झायरा वसिम (सिक्रेट सुपरस्टार)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 21, 2018 11:18 am

Web Title: filmfare awards 2018 winners list bollywood actor actress celebrities irrfan khan and vidya balan win big tumhari sulu hindi medium
Next Stories
1 ‘सर्वच माध्यमांवर सेन्सॉरशीप आणा’
2 कुठे कुठे जायचं शूटिंगला..
3 ‘उलट सुलट’ हृदय पिळवटणारी वेदना
Just Now!
X