अभिनेत्री उर्वशी रौतेला सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. सोशल मीडियावर व्हायरल होणारे फोटो आणि व्हिडीओजच्या माध्यमातून ती नेहमीच आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहाते. यावेळी उर्वशीने तिच्या वजनदार ड्रेसचा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. हा ड्रेस इतका मोठा होता की उर्वशीला बसण्यासाठी चक्क चार खुर्च्या वापराव्या लागल्या.

अवश्य पाहा – १०वी पास असलेल्यांसाठी ‘इस्रो’मध्ये नोकरीची सुवर्णसंधी; मिळणार ४५ हजार पगार

अवश्य वाचा – “बुलाती है मगर जाने का नहीं” असं म्हणणाऱ्या एक्स-बॉयफ्रेंडला अभिनेत्रीनं दिलं भन्नाट उत्तर

त्या ड्रेसमध्ये असं काय होतं?

उर्वशीने नुकत्याच पार पडलेल्या फिल्म फेअर पुरस्कार सोहळ्याला हजेरी लावली होती. या सोहळ्यात तिने आपल्या अनोख्या ड्रेसने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. उर्वशीने लाल रंगाचा फ्रॉक परिधान केला होता. या फ्रॉकचा घेर इतका मोठा आणि वजनदार होता की, चार माणसांना ते उचलावं लागत होतं. शिवाय तिला त्या ड्रेसमुळे खुर्चीवर बसणं देखील त्रासदायक वाटत होतं. परिणामी तिच्या फ्रॉकसाठी आणखी चार खुर्च्या मागवण्यात आल्या.

अवश्य पाहा – अन् नेहा कक्करनं दिली दोन-दोन हजारांच्या नोटेची भीक

अवश्य वाचा – गोरिलासोबत अभिनेत्रीचा भन्नाट डान्स; व्हिडीओ व्हायरल..

उर्वशीने हा गंमतीशीर प्रसंग इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. काही तासांत शेकडो नेटकऱ्यांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही नेटकऱ्यांनी तर तिची खिल्ली देखील उडवली आहे.