दिग्दर्शक अनुराग कश्यपचा टू-पार्ट माफिया ड्रामा ‘गँग्स ऑफ वासेपुर’ हा चित्रपट २२ जून २०१२ मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात कोळसा खाणीने समृद्ध असलेल्या वासेपुर गावावर अधिराज्य गाजविण्यासाठी दोन माफिया कुटुंबियांमधील गँगवॉर अतिशय कौशल्यपूर्णतेने दाखविण्यात आले होते. सात वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘गँग्स ऑफ वासेपुर’ या चित्रपटासंबंधी अनुराग कश्यप यांनी ट्विट केले आहे.

“बरोबर सात वर्षांपूर्वी माझे आयुष्य उद्ध्वस्त झाले. तेव्हापासून मी एकच गोष्ट पुन्हा पुन्हा करावी असे सगळ्यांना वाटत आहे. मी या अपेक्षांपासून दूर जाण्याचा अयशस्वी प्रयत्न करत आहे. ही साडेसाती २०१९ च्या शेवटी संपेल अशी आशा आहे.” असे ट्विट कश्यप यांनी शनिवारी २२ जून रोजी केले आहे.

या चित्रपटात कोळसा खाणीने समृद्ध असलेल्या वासेपुर गावावर अधिराज्य गाजविण्यासाठी दोन माफिया कुटुंबियांमधील गँगवॉर अतिशय कौशल्यपूर्णतेने दाखविण्यात आले आहे. तीव्र हिंसात्मक आणि त्या काळच्या साचेबद्ध मांडणीमुळे हा चित्रपट भारतात सर्वांचे लक्ष वेधून घेणारा ठरला होता. दिग्दर्शक अनुराग कश्यपचेही या चित्रपटाच्या दिग्दर्शनावरून बॉलीवूडकरांनी कौतुक केले होते.