गुरूवारी चेन्नई येथे निर्माता- दिग्दर्शक गौतम वासुदेव मेनन यांच्या गाडीचा अपघात झाला. दुपारी ३.३० ते ४.०० च्या सुमारास भोर येथील पूर्व किनाऱ्याच्या रस्त्यावर ही दुर्घटना घडली. गौतमच्या मर्सिडीज बेंझला एका लॉरीने टक्कर दिली. या अपघातात गौतम याला किरकोळ दुखापत झाली.

घटनास्थळी उपस्थित असलेल्या लोकांनी या अपघाताची पोलिसांना सूचना दिली. यासंदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गौतमने मद्यप्राशन केले नव्हते तसेच ते वेगात गाडीही चालवत नव्हते, अशी माहिती पोलिस अधिकाऱ्याने एका वृत्तपत्राला दिली.

गौतम वासुदेव मेनन याला ‘जीवीएम’ या नावाने अधिक ओळखले जाते. त्यांनी आतापर्यंत अनेक तमीळ सिनेमांचे दिग्दर्शन केले आहे. त्याने बॉलिवूडच्या ‘रहना है तेरे दिल में’ (२००१) आणि ‘एक दिवाना था’ (२०१२) या सिनेमांचे दिग्दर्शन केले होते. गौतम सध्या ‘ध्रुव नचथिरम’ या थरारपटाचे दिग्दर्शन करत आहेत. पुढच्या वर्षी एप्रिल महिन्यात हा सिनेमा प्रदर्शित होईल.

थरारपटासोबतच ते ‘एन्नई नोकी पायम थोटा’ हा रोमॅण्टिक सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे. या सिनेमात धनुष आणि मेघा यांच्या मुख्य भूमिका आहेत.