News Flash

ऋषी कपूर कॅन्सरमुक्त; दिग्दर्शक राहुल रवैल यांची माहिती

ऋषी कपूर गेल्या काही महिन्यांपासून न्यूयॉर्कमध्ये आहेत.

ऋषी कपूर आणि दिग्दर्शक राहुल रावेल

ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर गेल्या काही महिन्यांपासून न्यूयॉर्कमध्ये आहेत. न्यूयॉर्कमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांचे कुटुंबीय प्रकृतीची माहिती सतत सोशल मीडियावर देत असतात. ऋषी कपूर आणि त्यांच्या कुटुंबीयांनी आजपर्यंत त्यांना नक्की कोणता आजार आहे हे स्पष्टपणे सांगितलं नव्हतं, पण त्यांना कॅन्सर असल्याची जोरदार चर्चा होती. अशातच आता दिग्दर्शक आणि ऋषी कपूर यांचे मित्र राहुल रवैल यांनी मोठा खुलासा केला आहे.

फेसबुकवर ऋषी कपूर यांच्यासोबतचा फोटो पोस्ट करत त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिलं, ‘ऋषी कपूर (चिंटू) आता कॅन्सरमुक्त आहे.’ राहुल रवैल यांनी दिलेल्या या माहितीनंतर ऋषी कपूर यांच्या चाहत्यांनी त्या पोस्टवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

जानेवारीत ऋषी कपूर यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट लिहित उपचारासाठी संयम नसल्याची भावना व्यक्त केली होती. ‘देवाच्या कृपेने मी आता बरा आहे. माझ्यात हळूहळू सुधारणा होत आहे. त्यामुळे लवकरच परत कामाकडे वळेन. मात्र या उपचारामुळे मी प्रचंड थकलो आहे. हा उपचाराचा प्रवास आणखी पुढेही काही काळ असाच सुरु राहणार आहे. हे सारं सहन करण्यासाठी संयम लागतो. पण तो माझ्या स्वभावात नाही,’ असं त्यांनी लिहिलं होतं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 30, 2019 12:16 pm

Web Title: filmmaker rahul rawail says rishi kapoor is now cancer free
Next Stories
1 आलिया भट्टला ‘हा’ अभिनेता वाटतो रणबीरपेक्षा हॅण्डसम?
2 वरुणने जपली माणुसकी, मतदान केंद्रावर आजींना दिला मदतीचा हात
3 ‘मर्दानी’ राणी पुन्हा येतेय..
Just Now!
X