27 February 2021

News Flash

साय-फायपट अजूनही दुर्लक्षितच!

बॉलीवूडमध्ये साय-फाय चित्रपट करणारी सध्याची अशी ती एकमेव दिग्दर्शिका आहे.

 

|| रेश्मा राईकवार

साय-फायपट हा बॉलीवूडमध्ये अजूनही दुर्लक्षित असाच विषय आहे. एखादाच ‘रा वन’ नाहीतर ‘क्रिश’ येतो किं वा ‘रोबोट’ चमकू न जातो, पण त्यात कथेपेक्षा व्यावसायिक मसालाच जास्त. या अशा परिस्थितीत आरती कडाव नामक एक तरुण दिग्दर्शिका फक्त साय-फायपट करते आहे, ही बाब तशी लक्ष वेधून घेणारी. आरतीचा ‘कार्गो’ हा साय-फायपट काही दिवसांपूर्वी ‘नेटफ्लिक्स’वर प्रदर्शित झाला होता, आता तिचा ‘५५किमी/सेकं द’ हा नवीन साय-फायपट ‘डिस्ने-हॉटस्टार’वर प्रदर्शित झाला आहे. आरतीच्या या दुसऱ्या चित्रपटाचे वैशिष्ट्य म्हणजे हा संपूर्ण चित्रपट टाळेबंदीच्या काळात आयफोनवर चित्रित करण्यात आला आहे. बॉलीवूडमध्ये राहून साय-फाय चित्रपटच करण्याचा आग्रह जपणे हे खूप अवघड आहे, याचा अनुभव गाठीशी बांधूनच आपण आपली वेगळी वाट जपणार असल्याचे आरती निग्रहाने सांगते.

बॉलीवूडमध्ये साय-फाय चित्रपट करणारी सध्याची अशी ती एकमेव दिग्दर्शिका आहे. ‘व्हिसलिंग वुड्स इंटरनॅशनल’ या संस्थेतून चित्रपट क्षेत्राचे धडे गिरवून बाहेर पडलेल्या आरतीने साय-फायपटांवरच लक्ष के ंद्रित के ले. तिने चार-पाच लघुपट के ले तेही याच धाटणीचे… टाकाऊ वस्तूतून काही तरी सुंदर निर्माण करता येते, ही गोष्ट मला शाळेत शिकत असतानाच लक्षात आली होती. सुरुवातीला काही प्रयोग के ले त्यातून जे घडत गेले ते करताना मजाही आली. त्यानंतर चित्रपटनिर्मितीचे धडे घेत असतानाही साय-फाय पट हे इतर चित्रपटांपेक्षा वेगळे, विलक्षण आहेत हे जाणवले. एकीकडे वैज्ञानिक कथा-कादंबऱ्या वाचन, चित्रपट पाहणे हेही सुरूच होते. वास्तवदर्शी चित्रपटांतून जे मांडता येईल, त्यापेक्षाही चांगल्या पद्धतीने मला गोष्टी या शैलीतून मांडता येतील, असा विश्वाास वाटला म्हणूनच मी याकडे वळले, असे आरतीने सांगितले. बॉलीवूडमध्ये अजूनही मसाला-व्यावसायिक चित्रपटांचे वर्चस्व असताना, साय-फायपटांना निर्मात्यांचा कशा पद्धतीने प्रतिसाद मिळतो? या प्रश्नावर निर्माते अजूनही या जॉनरसाठी फारसे उत्सुक नसल्याचे ती सांगते.

‘मी आणि माझी टीम ज्या पद्धतीने चित्रपट करतो आहोत ते निर्मात्यांना आवडते आहे. अनेकजण आमच्याकडे चित्रपटाचे प्रस्ताव घेऊन येतात, मात्र त्यांना पूर्णपणे साय-फायपटावर भिस्त ठेवणे नको असते. ते कथेत बदल करायला लावतात किं वा तुम्ही पहिले आमचा चित्रपट करा, नंतर आपण साय-फाय चित्रपट करू, असा आग्रह धरणाऱ्यांची संख्या जास्त आहे. पण हळूहळू बदल होतो आहे’, असे आरती सांगते. या परिस्थितीत एकटीने चित्रपट बनवण्याचे आव्हान आरतीने अनेकदा पेलले आहे. मुळात साय-फाय चित्रपट करायचे असतील तर त्याच्यासाठी आर्थिक बळ पुरेसे मिळणार नाही, हे मी आता मनाशी पक्के  बांधलेले आहे. त्यामुळे अनेकदा जे स्रोत मला उपलब्ध आहेत, त्याचा आधार घेत मी चित्रपटाची कथा लिहिते, असे ती सांगते. ‘कार्गो’च्या निर्मितीच्या वेळी आलेला अनुभवही तिने सांगितला. माझ्या मित्रमंडळींची मला मोलाची मदत होते. एका मित्राच्या वडिलांचे रुग्णालय आहे, त्याने सांगितले की तुला हे चित्रीकरणासाठी उपलब्ध करून देऊ शके न. व्हिसलिंग वुड्स या संस्थेनेही काही गोष्टी उपलब्ध करून दिल्या. या उपलब्ध जागेचा, गोष्टीचा विचार करून मी कथा लिहिली आणि चित्रीकरण पूर्ण के ले, असे ती म्हणते. ‘कार्गो’मध्ये देव आणि राक्षस वेगळी संकल्पना न राहता ते एकत्र आले आहेत, अशी कल्पना मांडतानाच दूर अंतराळात असलेल्या अवकाशयानात माणसाचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या आत्म्याच्या मनातील सगळ्या स्मृती पुसून त्याला नवीन जन्म घेण्यासाठी परत पाठवण्याचे कार्य करणाऱ्या प्रहस्तसारख्या देवदूताची गोष्ट तिने रंगवली आहे. या कथेच्या निमित्ताने माणसाच्या जगण्याचा नेमका अर्थ काय, हेतू काय?, अशा प्रश्नांचा वेध घेण्याचा प्रयत्न आरतीने के ला आहे. तिचा दुसरा चित्रपटही असाच वैज्ञानिक संकल्पनेवर आधारित आहे.

‘५५ किमी/सेकं द’ या चित्रपटाचा अनुभव तर विलक्षण होता, असे ती सांगते. टाळेबंदीच्या काळात आजूबाजूला सगळे उदास, निराश करणारे वातावरण होते. या वातावरणात नुसते बसून राहण्यापेक्षा आपले काम आपण करत राहू या, असा विचार के ला होता. त्यावेळी सुरुवातीला आम्ही कथा लिहून पूर्ण के ली. मग कथेनुरूप कलाकारांची निवड के ली, त्यांच्याशी संवाद साधला. कलाकार किं वा माझ्या टीमपैकी कोणीही आम्ही एकत्र येणार नव्हतो. आम्हाला जिथे आहोत तिथे राहूनच हा चित्रपट करायचा होता. या चित्रपटात नऊ कलाकार आहेत, चार कलाकार दिल्लीत, एक अमेरिके त… अशा पद्धतीने आम्ही चित्रीकरण पूर्ण के ले. यात कलाकारांचे खूप मोलाचे सहकार्य लाभल्याचे ती सांगते. ‘५५ किमी/ सेकं द’ या चित्रपटात अभिनेत्री रिचा चढ्ढा महत्त्वाच्या भूमिके त आहे. रिचासह सगळ्याच कलाकारांनी आपापली रंगभूषा, वस्त्रभूषा, अभिनय आणि चित्रीकरण अशा सगळ्या जबाबदाऱ्या घेतल्या. त्यामुळे चित्रीकरण दूर राहूनही हसतखेळत पार पडले. चित्रपटाचे संकलनही आपणच घरून के ल्याचे आरती सांगते. आयफोनवर चित्रित झालेला आणि ऑनलाइन पद्धतीने पार पडलेला हा चित्रपट ‘डिस्ने हॉटस्टार’ या डिजिटल प्लॅटफॉर्मने प्रदर्शित करायचा निर्णय घेतला हीसुद्धा खूप आनंदाची गोष्ट ठरली, असे ती सांगते.

डिजिटल प्लॅटफॉर्मसचा मोठा आधार

सुरुवातीला यूट्यूबवर चित्रपट प्रदर्शित करा किं वा चित्रपटगृहातून दाखवा, असे दोनच मार्ग होते. त्यावेळी चित्रपटनिर्मितीचे गणित अवघड वाटत होते. आता मात्र खूप डिजिटल प्लॅटफॉम्र्स आले आहेत आणि त्यांना वेगळ्या संकल्पनेवरचे, काही वेगळा आशय असणारे चित्रपट, लघुपट हवे आहेत. तर दुसरीक डे प्रयोगशील चित्रपटकर्मींनाही त्यामुळे दर्जेदार, हटके  चित्रपट करण्याची संधी मिळाली आहे. मी याआधी के लेले लघुपटही अ‍ॅमेझॉन, मुबी अशा वेगवेगळ्या प्लॅटफॉम्र्सवर घेतले गेले, त्यातून निर्मितीचा खर्चही वसूल झाला आणि मला आर्थिक फायदाही झाला. डिजिटली चित्रपट वितरणाच्या खूप संधी उपलब्ध असल्याने नवोदित चित्रपटकर्मींना भक्कम व्यासपीठ मिळाले आहे, असे आरती सांगते.

प्रयोगशील कलाकारांचा सहभाग जास्त

आरतीने आत्तापर्यंत विक्रांत मसी, रिचा चढ्ढा, श्वेता त्रिपाठीसारख्या तुलनेने नवीन कलाकारांबरोबर काम के ले आहे. याबद्दल बोलताना आरती म्हणते, मुळात वैज्ञानिक कथा-कल्पनांवर आधारित चित्रपट करताना त्या कथेवर कलाकारांचा विश्वास बसणे आवश्यक आहे. त्यांना मनापासून कथा पटली तर पडद्यावर ते आपल्या अभिनयातून त्यात आणखी रंगत आणतात, तसे झाले नाही तर चित्रपट सपशेल फसतो. त्यामुळे काहीतरी वेगळे करायची इच्छा असलेल्या कलाकारांबरोबरच मी काम करते. विक्रांत, श्वोता किं वा रिचा चढ्ढा यांनी आपल्या कारकीर्दीतही कायम वेगळ्या भूमिका, चित्रपट करण्यावर भर दिला आहे. असे कलाकार नानाविध पद्धतीने आपल्या अभिनयातून सहज व्यक्त होत असतात. रिचा चढ्ढाच्या बाबतीत बोलायचे तर चित्रपटात तिची भूमिका खूप मोठी नाही, मात्र तरीही सुरुवातीपासून शेवटपर्यंत तिचा चित्रपटाच्या प्रक्रियेत सहभाग होता. अगदी जीव ओतून त्यांनी काम के ले आहे. अशा प्रयोगशील कलाकारांबरोबर काम करणे आनंददायी आणि शिकवणारा अनुभव असतो, असे तिने सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 24, 2021 12:03 am

Web Title: films from whistling woods international robot netflix disney hotstar akp 94
Next Stories
1 ‘अभिनय कौशल्याला प्राधान्य’
2 जनसेन्सॉरशिप
3 निवड आणि परवडीच्या मध्ये कुठेतरी…
Just Now!
X